minister Rohan Khaunte post on Rover Pragyan Dainik Gomantak
गोवा

चंद्रावरील प्रज्ञानची 'ती' ईमेज खोटी, गोव्याच्या आयटी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसची मागणी

मंत्री खंवटे यांनी समाज माध्यमांवरुन दावा केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress On Min Rohan Khaunte: माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचा अपमान करून गोव्याला शरमेने मान खाली घालण्यास भाग पाडले आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी भाजप खोटी माहिती पसरवत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. याप्रकारामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस मीडिया सेलचे प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

मंत्री खंवटे यांनी समाज माध्यमांवरुन रोव्हर प्रज्ञानाद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर भारतीय राष्ट्रीय चिन्ह कोरले गेले होते असा दावा केला होता. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत, पणजीकर यांनी इस्रोने जारी केलेला अधिकृत व्हिडिओ प्रसारित करून मंत्री खंवटे यांचा दावा खोटा असल्याचे सागितले.

"हा इस्रोचा अधिकृत व्हिडिओ आहे जो सत्य दाखवतो आणि प्रसिद्धीसाठी भाजपच्या 'फेक इन इंडिया' चा पर्दाफाश करतो. तुम्हाला गोव्याचे मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नाही. तुम्ही भारतातील मेहनती शास्त्रज्ञांचा अपमान केला आहे. गोव्याची मान लाजेने खाली घातली आहे. तात्काळ राजीनामा द्या", असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

मंत्री खंवटे यांनी माफी मागून सर्व समाजमाध्यमांवरुन सदर पोस्ट काढून टाकावी, अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

भाजपचे मंत्री आणि नेते भारतातील वैज्ञानिक संशोधनाचा पाया रचणारे दूरदर्शी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याविषयी बोलतात. पंडित नेहरू, सरदार पटेल, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्यांमुळेच आज भारत चंद्रावर पोचला आहे.

स्वातंत्र्यानंतर भाजपचे अल्पदृ्ष्टीचे नेते सरकारात असते तर भारत आज कुठे असता याची कल्पना करा, असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT