Yakten, Sikkim Dainik Gomantak
गोवा

Digital Nomad Village: सिक्कीमच्या 'याकतेन'ने गोव्याला दिला 'डिजिटल नोमॅड'चा धक्का! हिमालयाच्या कुशीतले आदर्शवत गाव, इतरांसाठी उदाहरण

Yakten Sikkim: देशाच्या एका अप्रतिक्षित भागात पूर्व सिक्कीमच्या डोंगररांगांमध्ये भारताचा पहिला अधिकृत डिजिटल नोमॅड गाव उभे राहिले आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोवा सरकार गेली अनेक वर्षे किनाऱ्यांलगत ‘डिजिटल नोमॅड व्हिलेज’ उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगत आहे. पण याच दरम्यान, देशाच्या एका अप्रतिक्षित भागात पूर्व सिक्कीमच्या डोंगररांगांमध्ये भारताचा पहिला अधिकृत डिजिटल नोमॅड गाव उभे राहिले आहे. ‘याकतेन’ हे गाव आज देशातल्या ‘रिमोट वर्क’ संस्कृतीचे नवे प्रतीक बनले आहे.

गोवा ज्या गोष्टीची योजना करत होता, तेच सिक्कीमने कृतीत उतरवले. आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने सिक्कीम सरकारने याकतेन गावाला केवळ रिमोट वर्कसाठी सुसज्ज बनवलेच नाही, तर स्थानिक संस्कृती आणि शाश्वत पर्यटन यांचे सुरेख संमीलनही साधले आहे.

याकतेन गावाची खासियत म्हणजे तिथे कोणतेही भव्य ऑफिस नसून घरगुती होमस्टेच ‘कोवर्किंग स्पेस’ झाले आहेत. लिंबू आणि बौद्ध कुटुंबे इंटरनेट-सुसज्ज राहत्या घरांमध्ये कामासाठी आवश्यक वातावरण उपलब्ध करून देतात. चकचकीत कॉफीशॉपऐवजी येथे गरम नेटल सूप, सेल रोटी, ताजी चहा आणि मैत्रीपूर्ण संवाद लाभतात.

महत्त्वाचे म्हणजे, या गावात डिजिटल कनेक्टिव्हिटीसह माणूस-माणसातली नाती अधिक घट्ट करण्यावर भर दिला जातो. कामाच्या ब्रेकमध्ये पाहुणे निसर्गभ्रमंती, शेतीकामात मदत, स्थानिक लोककथांचे सादरीकरण यांत सहभागी होतात. येथे ‘वर्क-लाईफ बॅलन्स’ ही संकल्पना केवळ चर्चेपुरती न राहता जगण्याचा अविभाज्य भाग बनते.

याकतेनची भौगोलिक रचना आणि निसर्ग संपन्नता हीसुद्धा गोव्याला मागे टाकणारी ठरते. गंगटोकपासून अवघ्या ३५ किमी अंतरावर वसलेले हे गाव हिमालयीन सौंदर्याने नटलेले असून जैवविविधतेने समृद्ध आहे. झाडींमधून जाणाऱ्या सड्यांवरून ‘झांडी दारा’सारख्या पॉईंटवर जाताना भेटणारे पक्षी, फुलपाखरे, आणि वन्य फुलं पर्यटकांना मोहित करतात.

हे गाव आज जरी छोट्या प्रमाणावर (डझनभर होमस्टे) सुरू असले, तरी त्यातून भविष्यात भारतातील ग्रामीण भागात ‘डिजिटल जीवनशैली’ रुजविण्याची शक्यता स्पष्ट दिसते.

गोव्याचा धडा

गोव्यात अजूनही केवळ कल्पना आणि प्रस्तावांच्या पातळीवरच ‘डिजिटल नोमॅड व्हिलेज’ योजना घुटमळत आहे. भर उन्हाळ्यात आणि पर्यटकांच्या गर्दीतून कामासाठी स्थळ शोधणाऱ्या नोमॅडसाठी गोवा अजूनही गोंधळलेले आणि बुकिंगने भरलेले ठिकाण बनले आहे. याउलट याकतेनने शांततेच्या कुशीत, स्थानिकांचे सहजीवन जपत आधुनिकतेची जोड दिली आहे.

...गतिमान व्हावे!

याकतेनने दाखवलेला मार्ग गोव्यासारख्या पर्यटनमुखी राज्यासाठी एक स्पष्ट संदेश आहे. केवळ समुद्रकिनारे, रिसॉर्ट्स आणि ब्रॉशर नव्हे, तर डिजिटल युगासाठी आवश्यक विचार आणि कृती हवी. भारताची पहिली डिजिटल नोमॅड वसाहत गोव्यात नव्हे, तर सिक्कीमच्या डोंगरात उभी राहताना, गोव्यातील धोरणकर्त्यांनी या नवीन भारताच्या संकल्पनेत गोव्याची जागा टिकवून ठेवण्यासाठी सजग आणि गतिमान व्हायला हवे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

‘याकतेन’कडून शिकण्यासारखे

  • इंटरनेट सुविधेसह ग्रामीण अनुभव

  • पारंपरिक जीवनशैलीत आधुनिक कार्य संस्कृतीचा समावेश

  • स्थानिक कुटुंबांच्या सहकार्यातून अर्थसंकल्पिक प्रगती

  • शाश्वत पर्यटनाचा आदर्श नमुना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अ‍ॅलन-रविरा गोव्यात विवाहबद्ध! 'दिया और बाती हम' फेम अभिनेत्याने गर्लफ्रेन्डसोबत बांधली लग्नगाठ; पाहा Photos

आंध्रप्रदेशात पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमस्थळी शॉक लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु

Abhinav Tejrana Double Century: रणजी पदार्पणातच ठोकलं द्विशतक, तेंडुलकर, कोहलीला जे जमलं नाही, ते करुन दाखवलं; अर्जुन तेंडुलकरनंतर गोव्याचा 'अभिनव' चमकला

गोवा म्हणजे फक्त Sun, Sand, Sea नाही! पर्यटनमंत्र्यांचा 'गेम-चेंजिंग' मास्टरस्ट्रोक, परशुरामाचा भव्य प्रकल्प बनणार नवी ओळख

PM Modi Diwali Celebration With Jawan's: ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जल्लोष! पंतप्रधान मोदी गोव्यात नौदलाच्या सैनिकांसोबत साजरी करणार यंदाची दिवाळी

SCROLL FOR NEXT