Govind Gaude Enters BJP Dainik Gomantak
गोवा

अखेर गोविंद गावडेंच्या हाती भाजपचा भगवा झेंडा

अपक्ष आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये केला प्रवेश

आदित्य जोशी

पणजी : अपक्ष आमदार आणि गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडेंनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत गोविंद गावडेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गोविंद गावडेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (Govind Gaude Enters BJP News Update)

माझ्या प्रवेशामुळे भाजपमध्ये (BJP) नाराजी आहे. मात्र ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसंच भाजप पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरणार असल्याचं गोविंद गावडेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर स्पष्ट केलं. तसंच भाजपने दिलेल्या सन्मानासाठी आपण त्यांचे आभार मानत असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या काळात विविध योजनांच्या माध्यमातून भाजप गोमंतकीय जनतेची सेवा करणार असल्याचंही गावडेंनी स्पष्ट केलं.

आपल्या प्रियोळ (Priol) मतदारसंघात माझ्या भाजपप्रवेशामुळे आणि उमेदवारीमुळे नाराज झाले असतील, मात्र सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याची गोविंद गावडेंनी सांगितलं. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय होईल आणि आपलं सरकार स्थापन होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी गोविंद गावडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं भाजपमध्ये स्वागत केलं आणि शुभेच्छाही दिल्या. गेल्या 5 वर्षांमध्ये गोविंद गावडेंनी राज्यात चांगलं काम केलं आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात नवभारत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Student Protest: जंतर मंतर छू:मंतर; गांधीवादी मार्गाने जिंकला जंतर-मंतरवरील लढा

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

Goa Water Issue: तीन महिन्यांतून एकदा वॉटर मीटर तपासणी सक्तीची! गोवा मानवाधिकार आयोगाचे PWD आणि आरोग्य खात्याला कडक निर्देश

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

SCROLL FOR NEXT