Independence Day Dainik Gomantak
गोवा

75th Indian Independence Day: वाळपई जिल्‍हाधिकारी कार्यालयात उत्साहात

आमदार डॉ. दिव्‍या राणे यांच्या हस्ते पार पडले ध्वजारोहन

दैनिक गोमन्तक

देशभरात आज सर्वत्र 75 वा स्वतंत्रदिन उत्साहात साजरा केला. राजशिष्टाचाराप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील मूख्य ध्वजारोहन केल्यानंतर देशात सर्वत्र ध्वजारोहन केले गेले. त्यानूसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गोव्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. तसेच आज वाळपई येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयालयात ही साजरा करण्यात आला.

या कार्यालयासमोर पार पडलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पर्येच्या आमदार डॉ. दिव्‍या राणे यांनी ही उपस्थिती लावली. त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तसेच वाळपई नगरपरिषदेचे सीईओ सूर्याजी राणे, सत्तरीचे मामलेदार कौशिक देसाई, उपजिल्‍हाधिकारी परब, वाळपोईचे माजी आमदार नरहरी हळदणकर,वाळपई नगरपरिषदेचे चेअरमन शहीद शेळके उपस्थित होते. तसेच सर्व शाळा, शासकीय कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

75 व्या स्वातंत्र्यदिनाचं सेलिब्रेशन रंगले

ब्रिटीशांच्या गुलामगिरीमधून भारतीयांची 15 ऑगस्ट 1947 दिवशी मुक्तता झाल्याच्या आनंदामध्ये दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा देशात 75 व्या स्वातंत्र्यदिनाचं सेलिब्रेशन रंगणार आहे.

दरम्यान भारतात कोरोनाचं संकट कमी झाल्याने सार्वजनिक स्वरूपात यावर्षी भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. यंदा गावागावात शाळा, कॉलेज, शासकीय, खाजगी कार्यालये या ठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो आहे. यानिमित्ताने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणार्‍या क्रांतिकाराकांचे, स्वातंत्र्य सैनिकांचे, नेत्यांचे स्मरण केले जाते आहे. तसेच ठिकठिकाणी ध्वजावंदन करून राष्ट्रगीत गाऊन देशाप्रती आदरभाव व्यक्त केला जातो आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT