Independence Day 2024 Dainik Gomantak
गोवा

Premendra Shet: स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक देशप्रेमी नागरिकांनी योगदान द्यावे; आमदार प्रेमेंद्र शेट

Independence Day 2024: सेवा बजावलेल्या अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवानांसह सरकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रमाणपत्रे देऊन गौरव

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आजच्या पिढीसह प्रत्येक देशप्रेमी नागरिकांनी योगदान द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने बरीच प्रगती केली आहे, असे डिचोलीत प्रेमेंद्र शेट बोलताना म्हणाले.

विविध कार्यक्रमांनिशी डिचोलीत शासकीय पातळीवरील स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे या नात्याने आमदार प्रेमेंद्र शेट आणि आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, मामलेदार प्रवीण गावस,संयुक्त मामलेदार श्रीपाद माजीक आणि अभिजित गावकर, गटविकास अधिकारी ओंकार मांद्रेकर, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर आणि महेश सावंत उपस्थित होते. तत्पूर्वी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांकडून मानवंदना स्वीकारली.

उपजिल्हाधिकारी कासकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन दत्तात्रय परब आणि वैशाली पिळयेकर यांनी केले. विठ्ठलापूर येथील श्री विठ्ठल रखुमाई सरकारी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विशेष नृत्य सादर करुन देशभक्ती जागृत केली. ज्येष्ठ नागरिकांतर्फे प्रकाश शिरोडकर आणि म. कृ. पाटील यांनी कविता सादर केल्या. या सोहळ्यास ज्येष्ठ नागरिक, दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांचा परिवार उपस्थित होता.

अग्निशमन जवानांचा गौरव

शेट्ये म्हणाले, यांनी यावेळी बोलताना आजच्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्याची गरज प्रतिपादली. शासकीय कामांसाठी सरकारी कार्यालयात येणाऱ्या लोकांना चांगली वागणूक आणि तत्पर सेवा द्या. असे आवाहनही त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना केले. पावसाच्या तडाख्यात आपत्ती कोसळली तेव्हा उत्कृष्ट सेवा बजावलेल्या अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवानांसह सरकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात धर्मांतरविरोधी कठोर कायदा करा; हिंदू राष्ट्र समन्वय समितीची मागणी

Government Employees: वृद्ध पालकांच्या देखभालीसाठी सरकारी कर्मचारी घेऊ शकतात 30 दिवसांची रजा, केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत स्पष्टच सांगितलं

Viral Video: नवा जुगाड, नवा व्हिडिओ! सोशल मीडियावर धुमाकूळ, तुम्हीही म्हणाल, 'क्या बात है!'

'म्हादई आमची लढाई, आमचे आम्हाला मिळत नाही तोवर विश्रांती नाही'; प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यानंतर DK शिवकुमारांचा इशारा

August 2025 Horoscope: मेष ते मीन... ऑगस्टमध्ये 'या' 5 राशींच्या कुंडलीत अशुभ योग, खर्च आणि तणावात वाढ!

SCROLL FOR NEXT