Green buildings in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Green Buildings: कॉंक्रिटीकरणाने ग्रस्त झालेल्या गोव्यासाठी ‘हरित इमारत’ हाच पर्याय, पुढाकार घेणे गरजेचे

Green buildings in Goa: राज्यातील समुद्रकिनाऱ्यांनादेखील कॉंक्रिटीकरणाचे ग्रहण लागले आहे. शहरातील वाढती लोकवस्ती, टोलेजंग इमारती किंवा इतर बांधकामे रोखणे कठीण आहे

Sameer Panditrao

पणजी: शहरांमध्ये भल्यामोठ्या इमारती होत आहेत. या इमारती बांधताना पर्यावरणाचा, आरोग्यविषयक आणि वाढत्या तापमानाचा कितपत विचार केला जातोय हा एक जटिल प्रश्‍न आहे. आज गोव्यातील गावेदेखील कॉंक्रिटीकरणाने ग्रस्त आहेत.

राज्यातील समुद्रकिनाऱ्यांनादेखील कॉंक्रिटीकरणाचे ग्रहण लागले आहे. शहरातील वाढती लोकवस्ती, टोलेजंग इमारती किंवा इतर बांधकामे रोखणे कठीण आहे; परंतु पर्यावरणाचा, आपल्या आरोग्याचा विचार करत ‘हरित इमारती’ उभारणीच्या अनुषंगाने एक पाऊल पुढे टाकणे काळाची गरज आहे.

गोवा हे आर्थिक, शैक्षणिक तसेच इतर दृष्टीनेदेखील एक प्रगत राज्य आहे; परंतु आजही राज्यात बांधकाम क्षेत्रात हरित इमारत (ग्रीन बिल्डिंग)ची संकल्पना रुजलेली नाही, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.

पणजी, म्हापसा, वास्को, मडगाव, फोंडा आदी भागात टोलेजंग इमारती बांधल्या जात आहेत. अनेक फ्लॅटची विक्रीही सुरू आहे; परंतु आज नागरिक असोत किंवा कंत्राटदार कोणीच याबाबत बोलत नाही.

राज्यातील वाढत्या शहरीकरणातील तापमान वाढ, प्रदूषण कमी करायचे असेल तर हरित इमारतीवाचून पर्याय नाही. त्याअनुषंगाने सरकार तसेच बांधकाम संघटनांनी पुढाकार घेणे, नागरिकांमध्ये याबाबत जागृती निर्माण करून हरित इमारती उभारण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे. नागरिकांमध्ये जागृती झाल्यास नागरिक अशाप्रकारच्या इमारतींच्या बांधकामाकडे वळतील.

‘हरित इमारत’ म्हणजे काय?

आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांचे संवर्धन करत, पर्यावरणाची अजून हानी होणार नाही याची काळजी घेत उभारलेल्या इमारतीला आपण ‘हरित इमारत’ (ग्रीन बिल्डिंग) म्हणू शकतो. ‘हरित इमारत’ उभारणीचे पॅसिव्ह, इंटिग्रेटेड, हायब्रिड असे अनेक प्रकार आहेत. आपल्या आवश्‍यकतेनुसार या पद्धतींचा अवलंब करता येतो.

खर्चिक बांधकाम

हरित इमारती उभारण्याचा खर्च कॉंक्रिटीकरणात बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या तुलनेत काहीअंशी अधिक आहे; परंतु ही वनटाइम इन्व्हेस्टमेंट असून त्याचा परतावा दीर्घकालीन आहे. हरित इमारतीच्या सामग्रीवर काही प्रमाणात सवलत मिळाल्यास, या इमारतींचा खर्च सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांना परवडण्यायोग्य झाल्यास, नागरिकांमध्ये जागृती झाल्यास नागरिक अशाप्रकारच्या इमारतींच्या बांधकामाकडे वळतील.

‘हरित इमारती’चे फायदे

१.हरित इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे, वेली, लहान रोपे यांचा समावेश असतो त्यामुळे निसर्गाशी जवळीक राहते.

२.कॉंक्रिटीकरणाच्या विळख्यात ‘हरित इमारत’ ही आरोग्याच्या अनुषंगाने लाभदायी ठरते.

३.इमारतीच्या आजूबाजूची झाडे तापमान कमी करू शकतात, किचन गार्डन, रूफटॉप गार्डन किंवा बॅकयार्ड गार्डन्स अशा संकल्पना राबवता येतात.

४.पर्यावरण, अर्थकारण आणि शाश्‍वत विकासाला चालना देण्यात हरित इमारती महत्त्वाची भूमिका निभावतात.

५.सरकारकडूनही अशाप्रकारच्या इमारती उभारण्याला परवानगी प्राधान्याने देण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT