दाबोळीवर वाढतेय विमानांचे ‘लॅंडिंग Dainik Gomantak
गोवा

नियम पाळा; प्रवास करा; शारजाहातून 160 पर्यटक गोव्यात

दाबोळीवर वाढतेय विमानांचे ‘लॅंडिंग’, दिवसाला 30 प्रवासी विमाने गोव्यात दाखल

दैनिक गोमन्तक

दाबोळी: कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर दाबोळी (Dabolim Airport) विमानतळावर देशातील विविध भागांतून येणाऱ्या प्रवासी विमानांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे दाबोळी विमानतळावर विमानांच्या लँडिंगमुळे (landing) विमानतळ पुन्हा गजबजू लागले आहे. शुक्रवारी पहाटे 'एअर अरेबिया' (Air Arabia) विमानाने प्रवाशांना घेऊन संयुक्त अरब अमिरात (UAE) कडे उड्डाण केले. तर शारजाह येथून 160 प्रवाशांना घेऊन एअर अरेबियाचे विमान आल्याची माहिती दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी ‘गोमन्तक’ ला दिली. (increasing planes landing at Dabolim airport in Goa)

एअर अरेबिया गोव्यासाठी शारजाह येथून मंगळवार, गुरुवार, शनिवार असे तीन दिवस उड्डाण करणार आहे, असेही ते म्हणाले. जून महिन्यात दाबोळी विमानतळावर एकूण 356 देशांतर्गत विदेशी विमाने दाखल झाली. यात एकूण 23 हजार 334 प्रवासी दाखल झाले. जुलै महिन्यात 725 विमानातून 66230 प्रवासी दाखल झाले.

नियम पाळा; प्रवास करा

कोरोनाचा जोर ओसरू लागल्याने काही नियम लागू करून प्रवाशांना आणण्यास मुभा देण्यात आली आहे. शुक्रवारी दाबोळीवरून पहिले विमान शारजाहला 30 प्रवाशांना घेऊन रवाना झाले. जे तीस प्रवासी संयुक्त अरब अमिरातकडे रवाना झाले. मार्गदर्शक तत्वानुसार, चार तास अगोदर रॅपिड ॲंटिजेन चाचणी करण्यात आली. पहिल्या दिवशी जरी तीस प्रवासी संयुक्त अरब अमिरातकडे गेले असले तरी येणाऱ्या दिवसांत प्रवासी संख्येत वाढ होईल, अशी आशा मलिक यांनी व्यक्त केली. शारजाहून गोव्यात 160 प्रवासी आले. दुसऱ्या लाटेनंतर विमानसेवा सुरू झाल्यावर आतापर्यंत सर्वाधिक प्रवासी गुरुवारी आले. आम्ही प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देत आहोत, असे ते म्हणाले.

लॉकडाऊनचा फटका

कोरोनाचा फटका गोव्यातील विविध औद्योगिक क्षेत्रासह विमानसेवेलाही बसला. महामारीपूर्वी विविध भागांतून दिवसाला 77 विमाने येत होती. नंतर ती विमाने येथून दुसऱ्या प्रवाशांना घेऊन विविध ठिकाणी जायची. दीड वर्षांपूर्वी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्यानंतर दाबोळीवर येणारी प्रवासी विमानसेवा ठप्प झाली होती.

"दाबोळी विमानतळ टर्मिनलवर अधिक सुसज्ज आणि अद्ययावत सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञान असलेले पद्धती स्वीकारण्यात येत आहे. विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर मोठा लाभ होईल."

- गगन मलिक, दाबोळी विमानतळाचे संचालक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

SCROLL FOR NEXT