Beggars in Panaji City Dainik Gomantak
गोवा

Beggars in Panaji City: सरकारचे विद्युत भवन बनले भिकाऱ्यांचे 'आश्रयस्थान'! राजधानीत वाढली संख्या

Goa Capital Panaji: राजधानीत भिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सध्या अष्टमीची फेरी मांडवी तीरावर सुरू असल्याने भिकाऱ्यांच्या संख्येत अधिकच वाढ झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

राजधानीत भिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सध्या अष्टमीची फेरी मांडवी तीरावर सुरू असल्याने भिकाऱ्यांच्या संख्येत अधिकच वाढ झाली आहे. हे भिकारी कुठून येतात आणि यांचा तारणहार कोण आहे, याची चौकशी होणे गरजेचे आहे, मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे प्राथमिक स्वरूपात दिसून येत आहे. सध्या या भिकाऱ्यांनी सरकारची विद्युत भावन इमारत आपले आश्रयाचे ठिकाण केले आहे.

विशेष म्हणजे याच विद्युत भवन इमारतीत सरकारचे गोवा माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे कार्यालय आहे. इमारतीखाली भिकारी आपला थाट मांडून बसत आहेत, ही माहिती बहुतेक माहिती आणि प्रसिद्धी खात्याला मिळत नसावी म्हणून आजवर भिकाऱ्यांवर कोणतीच कारवाई झाली नाही असा एक समज लोकांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे. शहरात कामासाठी अनेक लोक येतात आणि भिकाऱ्यांचा झुंड पाहिला की भीतीने त्यांना आपला मार्ग बदलावा लागतो. याची दाखल संबंधित विभागाने घेऊन ही माहिती खात्याचे मंत्री तथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना द्यावी अशी मागणी काही पादचाऱ्यांनी केली आहे.

सहज आणि सोप्या पद्धतीने कुठलेही कष्ट न करता पैसे कमविणे आजकाल एक वेगळाच व्यवसाय बनू लागला आहे. एस्कॉर्ट सर्विसच्‍या नावाने महिला पुरुषांना फसवितात व लोकांकडून पैसे उकळण्यासाठी गरजू लोकांना एकत्र करून त्यांच्याकडून भीक मागितली जाते. हे दोन वेगवेगळे व्‍यवसाय आता वाढू लागले आहे. भीक मागणे हा आजकाल व्यवसाय बनू लागला आहे तर काहीजण भिकाऱ्यांना एकत्र करून व्यवसाय करू लागले आहेत.

पैसे मागून भिकारी पितात दारू

पोलिस मुख्यालय आणि विद्युत भवन इमारतीत केवळ १०० मीटरचे अंतर आहे. तरीदेखील सर्व भिकारी एकत्र येऊन विद्युत भवन इमारतीखाली घेत असलेला आश्रय पोलिसांना कसा दिसत नाही? विशेष म्हणजे हे भिकारी भीक मागून याच इमारतीखालीच बसून दारू पितात. खाण्यासाठी पैसे नसल्याने पैसे मागत असलेले भिकारी जेव्हा दारू पितात तेव्हा त्यांच्याकडे पैशांची कमतरता आहे असे समजणे चुकीचे ठरेल. या भिकाऱ्यांचा कुणीतरी व्यवसाय करत आहे असे त्यांच्या वागण्यातून सतत जाणवत असल्याचे अष्टमीला येणारे लोक देखील बोलू लागले आहे.

त्यापेक्षा घरी जाणे योग्य

पणजी शहरात सद्या अष्टमीची फेरी सुरु आहे. ही फेरी राज्यभरात प्रसिद्ध आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक या फेरीत चतुर्थीला लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी येतात. यावेळी भिकारी भीक मागण्यासाठी जवळ येत असल्याचे पाहून काहीजण आपला मार्ग बदलतात. काहीजण वस्तू खरेदी करणे बाजूला सारून घरी जाणे ग्राहक पसंत करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shri Shantadurga Jatra: श्री शांतादुर्गा देवी ही केवळ कुलदेवता नसून, ती शांती, समन्वय आणि करुणेची मूर्तिमंत अनुभूती आहे..

टेक्नॉलॉजीचा गैरवापर की अश्लीलतेची फॅक्टरी? एलन मस्कचा 'Grok AI' वादाच्या भोवऱ्यात; 11 दिवसांत बनवले 30 लाख आक्षेपार्ह फोटो

प्रेमाचा सापळा आणि मृत्यूचा खेळ! एकाच कुटुंबातील चौघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा; इभ्रतीसाठी क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्यांना दणका

Viral Video: कोकणी गाण्यावर आजीबाईचा तूफानी डान्स, लॉर्ड बॉबीला पाडलं फिकं; नेटकरी म्हणाले, ''आज्जी तुम्ही रॉकस्टार!"

Sarfaraz Khan: सरफराजचा 'धूमधडाका'! 19 चौकार, 9 षटकार अन् 5वी 'डबल सेंच्युरी'; हैदराबादच्या गोलंदाजांना धुतलं Watch Video

SCROLL FOR NEXT