Bicholim IDC Theft Crime Canva
गोवा

Bicholim IDC: 'डिचोली औद्योगिक वसाहती'मध्ये चोऱांचा सुळसुळाट! त्रस्त उद्योजकांची पोलिस स्थानकाला धडक

Bicholim Theft News: डिचोली येथील औद्योगिक वसाहतीत (आयडीसी) भुरट्या चोऱ्या वाढल्या असून अज्ञात चोरट्यांकडून विविध आस्थापनांना लक्ष्य करण्यात येत आहे. चोरांनी दणका देताना एका आस्थापनात चोरी करून केबल पळवण्याची घटना घडली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim IDC Theft

डिचोली: येथील औद्योगिक वसाहतीत (आयडीसी) भुरट्या चोऱ्या वाढल्या असून अज्ञात चोरट्यांकडून विविध आस्थापनांना लक्ष्य करण्यात येत आहे. काल (रविवारी) रात्रीही चोरांनी दणका देताना एका आस्थापनात चोरी करून केबल पळवण्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी डिचोली पोलिस स्थानकात तक्रार करण्यात आली आहे. भुरट्या चोऱ्या वाढल्याने आयडीसीमधील उद्योजकांमध्ये खळबळ माजली असून ते हैराण झाले आहेत. भुरट्या चोऱ्यांवर आळा घाला, अशी मागणी उद्योजकांनी पोलिसांकडे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या जवळपास तीन वर्षांपासून ‘आयडीसी’त अधूनमधून चोऱ्या घडत आहेत. आयडीसीत पोलिस गस्त असतानाही चोऱ्या घडत असल्यामुळे उद्योजकांनी आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली आहे.

पोलिस स्थानकावर धडक

आयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी डिचोली पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांची भेट घेतली. ‘आयडीसी’त वाढलेल्या चोऱ्यांबद्दल उद्योजकांनी खंत व्यक्त करून पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी केली. पोलिस निरीक्षकांनी आवश्यक ती पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन दिले. पोलिस निरीक्षकांना भेटलेल्या शिष्टमंडळात निखिल दीक्षित, सिद्धेश जिरगे, सुनील वेंगुर्लेकर, महेश नाईक आदींचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT