Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मच्छीमारांच्या होड्यांना आग लावण्याच्या प्रकाराने खळबळ; गस्त वाढविण्याची मागणी

वाडी-बाणावलीत 15 दिवसांत दोनदा पेटवल्या होड्या; 1 कोटीचे नुकसान

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Crime: वाडी-बाणावली येथे गेल्‍या पंधरा दिवसांच्या अवधीत दोनवेळा मच्छीमारांच्या होड्यांना आग लावण्याचे प्रकार घडल्याने तेथे खळबळ माजली आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी या भागात रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

या दोन दुर्घटनांत एकूण चार होड्या आणि जाळी जळून खाक झाली. त्यामुळे किमान 1 कोटी रुपयांचे नुकसान झालेल असून पोलिसांपुढे आरोपींनी शोधण्‍याचे मोठे आव्‍हान उभे ठाकले आहे.

व्यावसायिक दुष्मनीतून हे आग लावण्याचे प्रकार घडले असून याची सखोल चौकशी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना पेले फर्नांडिस यांनी सांगितले की, मच्छीमारांना सुरक्षा मिळावी यासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज आहे.

आम्हाला आमच्या होड्या आणून ठेवण्यासाठी किनाऱ्यावर किमान 500 मीटर जागा द्यावी. मच्छीमार खात्याकडे तेथे दीड लाख चौरस मीटर जमीन उपलब्ध असून ती खासगी आस्थापनाला हे खाते भाडेपट्टीवर देऊ पाहत आहे.

परिसरातील लोकांचे उपजीविकेचे साधन मासे मारणे असल्याने होड्यांच्या झालेल्या नुकसानीमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. या परिसरातील मच्छीमारांनी एकजूट दाखविणे गरजेचे असल्याचे

दरम्यान, याबाबत बोलताना आमदार वेन्झी व्हिएगस यांनी यापुर्वी सांगितले होते की, मी यासंदर्भात पर्यटन आणि मच्छीमार खात्याच्या मंत्र्यांशी बोललो आहे. समुद्र किनाऱ्यांवर सर्वच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kasaarvarne School Vandalism: कासारवर्णेच्या शाळेत तोडफोड; खिडक्यांच्या काचा फोडल्या, नळाची जोडणीही तोडली, पोलिसांत तक्रार

Viral Stunt Video: पठ्ठ्यानं 'नागराजा'सोबत घेतला पंगा, जीवघेणा स्टंट व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अरे भाई, हा जिवंत आहे की गेला'?

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

SCROLL FOR NEXT