धक्कादायक! समुद्र गिळतोय गोव्यातले किनारे... 'इस्रो'च्या अभ्यासातून भयाण वास्तव आले समोर...

दहा वर्षांत किनाऱ्यांवरील किती हेक्टर जमिन समुद्रात कायमस्वरूपी बुडाली घ्या जाणून
Soil erosion At Goa Coast
Soil erosion At Goa Coast Dainik Gomantak

ISRO Study on Soil erosion At Goa Coast: निसर्गचक्रावरील अमर्याद मानवी हस्तक्षेपाबरोबर विविध कारणांनी किनारपट्टीची धूप वाढत आहे. गेल्या १० वर्षांत तब्बल १५.२ हेक्टर गोव्यातील किनारपट्टीवरील जमिनीची धूप झाल्याचा अहवाल ‘इस्रो’च्या स्पेस ॲप्‍लिकेशन सेंटरने दिला आहे.

या प्रक्रियेचा वेग असाच राहिला तर राज्याला लाभलेल्या किनारपट्टीचा धोका वाढणार आहे. याचा परिणाम किनारपट्टी भागातील मानवी लोकवस्तीबरोबरच इतर जैवविविधतेलाही संभवतो. (Climate Change effects biodiversity)

Soil erosion At Goa Coast
Betting in Goa: पाकिस्तानमधील मॅचवर गोव्यात बेटिंग; दिल्लीच्या चौघांना अटक

ग्लोबल वार्मिंगमुळे (Global Warming) आर्क्टिक आणि अंटार्क्टिका या दोन्ही ध्रुवावरील बर्फ वितळण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. हे संशोधनातून पुढे आले असून हीच स्थिती अन्य भागांमध्ये आहे. एकूण उष्णतेचे प्रमाणही वाढत आहे. अशा स्थितीत समुद्र, किनारपट्टीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे.

गेल्या १० वर्षांत गोव्याला लाभलेल्या १०३ किलोमीटरच्या किनारपट्टीपैकी तब्बल १५.२ हेक्टर किनारपट्टीची धूप झाली आहे, असा धक्कादायक अहवाल भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्‍या (इस्रो) ॲप्‍लिकेशन सेंटरने दिला आहे.

२०१६ आकडेवारीनुसार गोव्यातील किनारपट्टीच्या धुपीमुळे सुमारे २८.८ हेक्टर जमीन नष्ट झाली तर १३.६ हेक्‍टर जमीन अभिवृद्धीद्वारे प्राप्त झाली आहे. गोव्यासाठी प्रभावी जमिनीचे नुकसान १५.२ हेक्टर इतके आहे. अभिवृद्धी वाढ ही समुद्रकिनाऱ्यावरील गाळ व वाळूच्या रूपाने किनाऱ्यावर किंवा किनाऱ्याच्या दृश्यमान भागाकडे परत येण्याची प्रक्रिया असते.

ही स्थिती अशीच राहिली तर किनारी भागाला मोठा धोका संभवतो. या प्रक्रियेमुळे एका ठिकाणी जमिनीची प्रभावी धूप होते आणि त्‍यामुळे नष्ट झालेली जमीन, माती किंवा वाळूच्या रूपात दुसऱ्या ठिकाणी एकत्रित येते. या संपूर्ण प्रक्रियेमुळे किनारपट्टीचा धोका वाढतो.

Soil erosion At Goa Coast
Vasco Crime: वास्कोत सहा दुचाकी पेटवल्या, पोलिसांत गुन्हा नोंद

देशाने गमावली ३६८० हेक्टर जमीन

पीअर रिव्हयुअल्‍ड जर्नल करंट सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार गेल्या १० वर्षात भारताची ३६८० हेक्टरपेक्षा जास्त जमीन नष्ट झाली आहे. अशा घटनेमुळे प्रादेशिक जैवविविधता धोक्यात येते. यामुळे स्थानिक प्राणी, पक्षी, वनस्पतींचा अधिवास कमी होतो. त्याचा संपूर्ण किनारपट्टी भागातील जल परिस्थितीला धोका निर्माण होतो.

अशी आहे गोव्यातील आकडेवारी

  • धूप : लांबी २१.७ किलोमीटर

  • अभिवृद्धी प्राप्त जमिनीची लांबी : ७.१ किलोमीटर

  • स्थिर लांबी : ११६.७ किलोमीटर

  • एकूण लांबी : १४५.६ किलोमीटर

  • धूप क्षेत्र : २८.८ हेक्टर

  • वाढ क्षेत्र : १३.६ हेक्टर

  • एकूण धूप : १५.२ हेक्टर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com