Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Police Drugs Raid: राज्यात अमली पदार्थ विक्री प्रकरणांत वाढ, शिवोलीत दोघांवर तर कळंगुटमध्ये एकावर कारवाई

कळंगुटमध्येही एकावर कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Police Drug Raid in Anjuna: सडये-शिवोलीत म्हापसा पोलिसांकडून अमली पदार्थ विरोधी छापेमारी सुरू असतानाच गुरुवारी (ता.४) हुडोवाडो-शिवोली येथे हणजूण पोलिसांकडून अमली पदार्थ कारवाईत सूरज प्रदीप तोडी (२९, दांडा-शिवोली, मूळ बंगळुरू-कर्नाटक) याला ड्रग्स बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले.

यावेळी त्याच्या ताब्यातील अंदाजे एक लाख रुपये किमतीचे एलएसडी पेपर्स व मारुती कार गाडी (एएस-०४/जी-३१८८) पोलिसांनी जप्त केली.

दरम्यान, ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून जप्त करण्यात आलेला एलएसडी पेपर्स हणजूण येथील कालिदास ऊर्फ काली मधुकर नाईक (५०, सेंट ॲंथनी वाडा, हणजूण) याच्याकडून विकत घेतल्याची माहिती सूरज तोडी याने दिली.

त्यानंतर तत्काळ तपासाची चक्रे वेगळ्या दिशेने फिरवीत हणजूण पोलिसांनी शिस्तबद्ध सापळा रचून संशयित कालिदास नाईक याला अवघ्या दोन तासांत हणजूण येथून ताब्यात घेतले.

दरम्यान, हणजूण पोलिसांकडून संशयितांच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला अाहे.

कळंगुटमध्येही एकावर कारवाई

परबवाडा-कळंगुट येथील बोडकेवड परिसरात कळंगुट पोलिस पथकाकडून माथियुर रेहमान (पश्चिम बंगाल) या मजुराच्या ताब्यातील बॅगची तपासणी केली असता अंदाजे 2 लाख 50 हजारांचा अमली पदार्थ पोलिसांच्या हाती लागला.

गुरुवारी (ता.४) दुपारी संशयावरून कळंगुट पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. यात हेरॉईन २१ ग्रॅम (किंमत अंदाजे 2 लाख 10 हजार रुपये) तसेच एमडीएमए ४ ग्रॅम (किंमत अंदाजे ४० हजार रुपये) मिळून एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा अमली पदार्थ यावेळी जप्त केला. कळंगुट पोलिसांकडून संशयित रहमान याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT