Sea Shore  Dainik Gomantak
गोवा

लॉकडाऊननंतर गोव्यातील समुद्र किनारे कचऱ्याच्या गर्ततेत

गोव्यातील किनार्‍यांवर साठलेला कचरा हा चिंतेचा विषय ठरत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: कोविड-19 निर्बंध शिथिल झाल्यापासून पर्यटकांनी आपला मोर्चा गोव्याकडे वळवला आहे. हे पर्यटक समुद्रकिनाऱ्यांवर फिरतात, पार्टी करतात. परिणामी समुद्रकिनाऱ्यांवर होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे.

गोव्यातील (Goa) किनार्‍यांवर साठलेला कचरा हा चिंतेचा विषय ठरत आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील कचरा वर्गीकरणामध्ये नायलॉनचे दोरे आणि रबर (फिशिंग गियर), प्लास्टिक (पॉलीथीन पिशव्या, सॅशे, स्नॅक बॉक्स, बाटल्या, इ.), पादत्राणे (चामड्याच्या वस्तूंव्यतिरिक्त), काच (दारूच्या बाटल्या, ग्लास आणि बल्ब), धातू ( कोणत्याही धातूच्या वस्तू) आदि वस्तु सापडत आहेत.

पहिल्या लॉकडाऊन (Lockdown) नंतर या काचऱ्यात वाढ झाल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. लॉकडाऊन दरम्यान आणि त्यानंतर लगेचच मासेमारी उद्योगातील मंदीमुळे समुद्रातील (Sea) थर्माकोल, धातू आणि रबरच्या वस्तूंचे प्रमाण कमी झाले आहे.

COVID-19 लॉकडाऊनच्या काळात प्रदूषण कमी झाले होते. प्रत्येक वेळी लॉकडाऊन करणे शक्य नसले तरी गावपातळीवर मोहीम राबवून लोकांना स्वच्छ किनार्‍यांचे महत्व पटवून देता येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; घराबाहेर आले...पोलिस घेऊन गेले...!

Naru In Goa: गोमंतकीयांसाठी धोक्याची घंटा! गोव्यात आढळला खतरनाक 'नारू'; खांडेपार, कुर्टी येथे सापडला जंतू

Tragic Death: काळीज पिळवटले! खेळता खेळता पडला विहिरीत, मृत्यूशी दिली झुंज; 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

Zenito Cardozo Case: शिरदोन गँगवॉर प्रकरण! जेनिटोला ‘सुप्रीम’ दिलासा; 3 वर्षांच्या शिक्षेला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती

Goa Crime: मालमतेच्या वादातून जबरी मारहाण, मृतदेह सापडला गंभीर अवस्थेत; 3 कामगारांना अटक, मुख्‍य सूत्रधार बेपत्ता

SCROLL FOR NEXT