Loutolim Robbery Video Dainik Gomantak
गोवा

Goa Theft Case : चोरीच्या घटनांनी सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर; लोटली येथेही बंगलाफोडीचा प्रयत्न

सलग दुसऱ्या दिवशी प्रकार; लाडफे मंदिरातील फंडपेटी फोडली

दैनिक गोमन्तक डिजिटल

झुवारीनगर-वास्को येथे चोरी करण्याचा प्रयत्न केल्यावर पळून जाताना गोळीबार करणाऱ्या ‘त्या’ चोरट्यांनी लोटली व डिचोली येथे चोरीच्या घटना घडल्या. त्यामुळे राज्यात सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

लोटली येथे एक बंगला लुटण्याचा प्रयत्न झाला. या चोरट्यांनी त्यापूर्वी एका युवतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला तर आणखी एका वृद्ध महिलेच्या बांगड्या चोरून नेल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र, यातील सोनसाखळी चोरून नेल्याची तक्रारच मायणा-कुडतरी पोलिस स्थानकावर नोंद करण्यात आली आहे.

मायणा-कुडतरी पोलिस स्थानकात जो गुन्हा नोंद करण्यात आला त्यात या चोरट्यांनी रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शांतीनगर-रावणफोंड येथे राहणारी युवती फराह खान (27) हीची 50 हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून पळ काढला.

ही युवती आपल्या मित्राबरोबर आंबोरा-लोटली येथे बोलत असताना काळ्या रंगाच्या पल्सर बाईकने दोन इसम तिथे आले आणि तिला धमकावून तिची सोनसाखळी घेऊन फरार झाले. ते दोघे जण होते. त्यातील एकाने नारिंगी रंगाचा तर दुसऱ्याने पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घातला होता. याच रंगाचे कपडे घातलेल्या दोघांनी एका वृद्ध महिलेच्या हातातील बांगड्या चोरून नेल्याचे सांगितले जाते.

असेच कपडे घातलेल्या दोघांनी लोटली येथील एक बंद बंगला फोडून आत प्रवेश केल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला असून या बंगल्यात त्यांना काहीच मिळाले नाही. मडगाव येथील पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांना यासंदर्भात विचारले असता पोलिसांचा तपास चालू आहे. एवढीच माहिती त्यांनी दिली.

एकाच टोळीतील सदस्यांचा हात

बंगल्यातील घरफोडी आणि महिलेच्या बांगड्या लुटल्याच्या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंबंधी पोलिसांशी संपर्क साधला असता या दोन्ही घटनांची कुणीही तक्रार दिलेली नाही, अशी माहिती मिळाली.

मात्र, जे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यातील चोरट्यांचे कपडे एकाचसारखे असल्याने या सर्व घटनांत एकाच टोळीतील सदस्य गुंतले आहेत, हे स्पष्ट होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT