Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दीड वर्षीय मुलाचं अपहरण करणाऱ्या दोघांना गावकऱ्यांनी शिकवला चांगलाच धडा; एकजण पोलिसांच्या ताब्यात, दुसरा फरार!

Sukalwad Korgao: व्हरांड्यात खेळणाऱ्या दीड वर्षीय तान्‍हुल्‍या मुलाचे अपहरण करू पाहणाऱ्या दोघा दुचाकीस्‍वारांचा प्रयत्‍न स्‍थानिकांनी हाणून पाडला.

गोमन्तक डिजिटल टीम

व्हरांड्यात खेळणाऱ्या दीड वर्षीय तान्‍हुल्‍या मुलाचे अपहरण करू पाहणाऱ्या दोघा दुचाकीस्‍वारांचा प्रयत्‍न स्‍थानिकांनी हाणून पाडला. ही घटना सुकाळवाडा-कोरगाव येथे शुक्रवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे; तर त्‍याच्‍या सहकाऱ्याने दुचाकी घेऊन पलायन केले. वेंगुर्लेकर कुटुंबीय रात्रीच्‍या वेळी घरात होते. लहान मुलगा व्हरांड्यात होता. घरानजीक एका दुचाकीवरून दोघे उतरले. हेल्‍मेट परिधान केलेल्‍या एकाने व्हरांड्यात असलेल्‍या मुलास उचलून पळ काढला. ही गोष्ट लक्षात येताच मुलाची आजी चंद्रिका यांनी आरडाओरडा करत स्थानिकांना बोलावले. त्‍यांनी संशयिताला अडवले, मुलाला ताब्‍यात घेतले व संशयिताला चोप दिला.

दुसरा संशयित दुचाकीवरून पळून गेला. या घटनेने परिसरात खळबळ माजली. ज्‍या मुलाला पळवून नेण्‍याचा प्रयत्‍न केला गेला, त्‍याचे वडील कमलेश हे ‘आयआरबी’ पोलिस असल्‍याचे कळते; तर संशयित हा मद्यधुंद अवस्‍थेत आढळून आला. त्‍याच्‍याकडे सुराही आढळून आला. पोलिस रात्री उशिरापर्यंत त्‍याचे नाव, मुलगा पळवण्‍यामागील हेतू जाणून घेत होते. पोलिसांना तो आपले नाव बापू असल्‍याचे सांगत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Diwali Celebration With Jawan's: ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जल्लोष! पंतप्रधान मोदी गोव्यात नौदलाच्या सैनिकांसोबत साजरी करणार यंदाची दिवाळी

Goa News: रामा कानकोणकर हल्ला प्रकरण; झेनिटो कार्डोझोला २ दिवसांची पोलिस कोठडी

Narkasur in Goa: 20 फुट उंच, अक्राळ-विक्राळ डोळ्यांचा महाकाय! जगात सापडणार नाही असा अनुभव; कुठे बघाल 'नरकासुर दहनाचा' थरार?

Afghanistan Pakistan Clash: तालिबानच्या हल्ल्याने पाकिस्तानची नाचक्की! सैनिकांच्या पॅन्ट आणि शस्त्रे जप्त; 48 तासांची युद्धबंदी जाहीर Watch Video

Inspirational Story: पुत्र व्हावा ऐसा... मुलाने आई - बाबांसाठी अमेरिकेत खरेदी केले आलिशान घर, कार; US दर्शनही घडवले Watch Video

SCROLL FOR NEXT