Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : डिचोलीत ‘वेलनेस सेंटर’चा शुभारंभ; केंद्र सरकारची योजना

Bicholim News : व्यापारी, ग्राहकांसाठी ठरणार उपयुक्त

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, ''मोहल्ला क्लिनिक''च्या धर्तीवर डिचोली बाजारातील व्यापाऱ्यांसह विक्रेते आणि ग्राहकांच्या सेवेसाठी आता दवाखाना (वेलनेस सेंटर) उभारण्यात येणार आहे.

बाजारातील प्रवेशद्वाराच्या कोपऱ्यात हा दवाखाना उभारण्यात येणार आहे. या दवाखान्यात डॉक्टर, परिचारिकेसह प्राथमिक उपचार सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे.

गुरुवारी (ता.२२) आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत ''जी-सुडा''तर्फे हा दवाखाना उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पावर ८४ लाख रुपये खर्च येणार आहे.

दवाखाना कामाच्या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी नगराध्यक्ष कुंदन फळारी, उपनगराध्यक्ष दीपा पळ, नगरसेवक ऍड. अपर्णा फोगेरी, सतीश गावकर, तनुजा गावकर, विजयकुमार नाटेकर, निलेश टोपले, सुखदा तेली, ॲड. रंजना वायंगणकर, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी रुपेश ठाणेकर आदी उपस्थित होते.

दवाखाना ठरणार वरदान !

बाजारातील व्यापाऱ्यांसह विक्रेते तसेच बाजारहाटीसाठी येणाऱ्या ग्राहकांना हा दवाखाना निश्चितच वरदान ठरणार आहे, असा विश्वास आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी व्यक्त केला.

बाजारातील एखाद्या व्यक्तीला आरोग्याची समस्या उद्भवल्यास, किंवा एखादेवेळी आपत्कालीन घटना घडली आणि एखादा नागरिक जखमी झाला. तर या दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात येणार आहेत, असेही डॉ. शेट्ये यांनी सांगितले. कुंदन फळारी यांनी या दवाखान्यामागील संकल्पना सांगितली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Flood Crisis: आधी पाण्यासाठी तडफडला, आता महापुराची भीती! निसर्गाच्या दुहेरी चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; भारताकडून कोणताही डेटा मिळेना

King Cobra Viral Video: 'स्टंट' पडला महागात! किंग कोब्राला किस करण्यासाठी झुकला अन् क्षणार्धात जीवघेणा हल्ला; व्हिडिओ पाहून अंगावर काटा

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी! रिपोर्ट कधी जाहीर होणार आणि पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या सर्व काही

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

SCROLL FOR NEXT