Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते शेळेर येथील सभागृहाचे उद्‍घाटन

काणकोणातील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शेळेर येथील सभागृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज (ता.10) उद्‍घाटन करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

राज्याच्या विकासाबरोबरच सरकारने मौलिक व मूल्य शिक्षणावर भर दिला आहे. चांगली पायाभूत सुविधा सरकारी व खासगी अनुदानित शाळांमध्ये (School) निर्माण करण्यावर सरकारचा (government) भर आहे, मात्र या सुविधांतून शैक्षणिक संस्थांतून कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण व्हावे, ही सरकारची अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी सांगितले.

काणकोणातील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शेळेर येथील सभागृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज (ता.10) उद्‍घाटन करण्यात आले. राज्य पायाभूत साधन सुविधा महामंडळातर्फे या सभागृहाची बांधणी करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे या सभागृहाचे काम रेंगाळले होते. सरकार तुमच्यादारी या कार्यक्रमाचे आयोजन या सभागृहात करण्यात आले होत. त्यावेळी या सभागृहाच्या अंतर्गत सुशोभीकरण कामाला चालना मिळाली. उद्‍घाटन सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसोबत उपसभापती इजिदोर फर्नांडिस, शिक्षण सचिव रवी धवन, शिक्षण संचालक भूषण सावईकर, प्राचार्य सेलिना डायस, उपप्राचार्य गौतमी भगत, राज्य पायाभूत साधन सुविधा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरिष हडकोणकर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सभागृह संकुलात उभारलेल्या पूर्णाकृती स्वामी विवेकानंदाच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

उपसभापती फर्नांडिस यांनी काणकोण मतदार संघाच्यावतीने आजपर्यत ज्या मागण्या सरकार व मुख्यमंत्र्याकडे केल्या, त्या आजपर्यंत पूर्ण झाल्या आहेत. काणकोणात मोखर्ड येथे लोकविश्वास प्रतिष्ठानची खास मुलांची शाळा आहे. त्याला भेट देण्याची मागणी उपसभापतींनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ती मागणी मान्य करून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या शाळेला भेट दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT