Margao Ravindra Bhavan Film Club Dainik Gomantak
गोवा

Margao Ravindra Bhavan: रवींद्र भवनच्या फिल्म क्लबचे रविवारी उद्‍घाटन

Film Club: ‘लापता लेडीज’ चित्रपटाचे होणार खास प्रदर्शन; अभिनेत्री छाया कदम यांची उपस्थिती

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव येथील रवींद्र भवनने सुरु केलेल्या फिल्म क्लबचे उद्‍घाटन रविवार ३० जून रोजी किरण राव यांनी दिग्दर्शित केलेला "लापता लेडीज" या चित्रपटाने होणार आहे.

या चित्रपटात अभिनेत्री छाया कदम यांनी मंजू माई या पात्राची भूमिका केली आहे. सैराट, फॅंड्री, अंधाधुंद, मडगाव एक्स्प्रेस हे तिची भूमिका असलेले काही प्रसिद्ध चित्रपट आहेत.

ही माहिती रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी उपाध्यक्ष मनोहर बोरकर, सदस्य सचिव आग्नेल फर्नांडिस यांच्या उपस्थितीत दिली.

या फिल्म क्लबतर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी इंग्रजी, मराठी, हिंदी, कोकणी व इतर भाषातील चित्रपटही प्रदर्शित केले जातील. शिवाय प्रेक्षकांना कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांच्याकडे थेट संवाद साधण्याची संधी मिळेल.

कदम यांच्याशी संवाद

या सोहळ्याला लापता लेडीज" चित्रपटातील अभिनेत्री छाया कदम उपस्थित राहणार आहे. चित्रपट समीक्षक व क्युरेटर सचिन चाटे तिच्याशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून काही आसने राखीव ठेवण्यात येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kushavati District: ‘कुशावती’बाबत नवीन अपडेट! भाडेकरू, हॉटेल कामगारांच्या पडताळणीचे आदेश; ओळखपत्राची सक्ती

1106 च्या ताम्रपटात उल्लेख असलेला गंडगोपाळ तलाव, करमळीचे सुलभातीचे तळे; गोवापुरीच्या जलव्यवस्थापनाचा लौकिक पुन्हा गवसेल?

Madhav Gadgil: खाण परिस्थिती नियंत्रणात आहे की नाही? गोव्यावर भरभरून प्रेम करणारे 'माधव गाडगीळ'

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT