Inauguration of Goa Pavilion at IITF Delhi
Inauguration of Goa Pavilion at IITF Delhi Dainik Gomantak
गोवा

‘IITF’ दिल्ली येथे गोवा पॅव्हेलियनचे उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक

पणजी : इंडिया ट्रेड प्रोमोशन संस्थेतर्फे (ITPO) आयोजित 40व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (IITF) गोव्‍याचा कक्ष (पॅव्हेलियन) उभारण्यात आला आहे. राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील प्रतिष्ठित प्रगती मैदानावर काल या मेळाव्याचे उद्‍घाटन करण्यात आले. माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या (DIP) माहिती साहाय्यक पूजा पालयेकर धारगळकर यांनी गोवा पॅव्हेलियनचे फीत कापून उद्‍घाटन केले. यावेळी गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाचे (Goa-IBP) प्रशासकीय अधिकारी सदाशिव नारायण पंडित, डीआयपीतून माहिती साहाय्यक रंजना मळीक, गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या (जीटीडीसी) साहाय्यक व्यवस्थापक दीपा सावकार आणि पर्यटन खात्यातील ज्युलिएट फर्नांडिस यावेळी उपस्थित होत्या.

या प्रसंगी, स्वयंपूर्ण गोवा, समृद्ध संस्कृती आणि गोवा मुक्तीची 60 वर्षे यासाठी सरकारने केलेल्या उपलब्धी आणि उपक्रमांचा समावेश असलेल्या माहितीपत्रकाचे गोवा गुंतवणूक, प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाचे सदाशिव पंडित यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हा मेळावा 27 नोव्हेंबर रोजी संपेल. गोवा पॅव्हेलियनमध्‍ये गोव्याच्या वास्तुकलेचे चित्रण, सौंदर्यपूर्ण उपक्रमांचे प्रदर्शन, राज्य सरकारच्या समाजकल्याण योजना यांचा समावेश आहे. माहिती आणि प्रसिद्धी खाते, 14 दिवसांच्या कालावधीत ‘आयआयटीएफ’मध्ये गोवा राज्याच्या सहभागासाठी नोडल एजन्सी आहे.

डीआयपी व्यतिरिक्त पर्यटन विभाग, हस्तकला, वस्त्रोद्योग आणि कॉयर विभाग, उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालय, गोवा पर्यटन विकास महामंडळ, गोवा गुंतवणूक प्रोत्साहन सुविधा मंडळ आणि गोवा औद्योगिक विकास महामंडळ यासारखे पाच विभाग यात सहभागी झाले आहेत. अॅडव्हर्टायझिंग असोसिएट्स या गोव्यातील नामांकित एजन्सींनी गोवा पॅव्हेलियन आणि संबंधित उपक्रमांची संकल्पना, रचना, उभारणी आणि व्यवस्थापन करण्याचे काम केले आहे. या मेळाव्यात दैनंदिन उपक्रमांव्यतिरिक्त गोव्याच्या लोक कलाकारांचे सांस्कृतिक सादरीकरण होईल, ज्यात गोव्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, हस्तकला आणि कारागिरांनी केलेल्या कलाकृतींची विक्री, सांस्कृतिक वारसा याशिवाय आदरातिथ्य सादर केले जाईल. गोव्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी, येथील औद्योगिक वाढ आणि पर्यटन कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यास गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. दरम्‍यान, गोवा पॅव्हेलियनच्या उद्‍घाटनापूर्वी भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे उद्‍घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेची मडगाव येथे रेंट अ बाईक सुविधा; विजय सरदेसाईंचा कडाडून विरोध, आंदोलनाचा इशारा

Goa Rain Alert: राजधानी पणजीसह गोव्यातील सात तालुक्यात वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता

Mahadev Betting App: 100 कोटींहून अधिकचे व्यवहार, 30 लाख गोठवले, 25 लाख जप्त; गोव्यात सात बुकींना अटक

Banking Sector Net Profit: मोदी सरकारच्या 10 वर्षात बँकिंग क्षेत्रात अमूलाग्र बदल; पहिल्यांदाच नफा 3 लाख कोटींच्या पार!

Shiroda SSC Result 2024: ‘ब्रह्मदुर्गा’ चा निकाल यंदाही १०० टक्के

SCROLL FOR NEXT