Holi celebrations dainik gomantak
गोवा

वास्कोत होलिकोत्सव उत्साहात

गुलालोत्सवाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरवात होणार

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्कोत होलिकोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. बेलाबाय वास्को येथे शेकडो भाविकांनी होळीला श्रीफळ वाढवून होळीचे पूजन केले. उद्या गुलालोत्सवाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरवात होणार आहे.

बेलाबाय तसेच वास्कोतील इतर भागांत आज होळीचे पूजन करून प्रार्थना केली. वर्षपद्धतीप्रमाणे बेलाबाय - वास्को येथे होळीचे दहन करून पूजन करण्यात आले. भाविकांनी दुपारी चार वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. संध्याकाळी सात वाजता होळी पूजन झाल्यानंतर शेकडो भाविकांनी होळी चरणी श्रीफळ वाढवून नतमस्तक झाले.

दरम्यान, श्री खाप्रेश्वर बेलाबाय येथील मंडपात आज संध्याकाळी होळी पूजन झाले. उद्या 18 रोजी गुलालोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 19 रोजी 7 वा. श्री वाप्रेश्वर बेलाबाय नाट्य मंडळातर्फे पारंपरिक ‘दशावतारी काला’ होणार आहे. तद्नंतर श्री खाप्रेश्वर तरुण हौशी कलाकार बेलाबायतर्फे ‘आमी ना कमी’ नाटक सादर केले जाईल. 20 रोजी रात्री 7 वाजता मुरगाव तालुका मर्यादित ‘एकेरी नृत्य स्पर्धा’ होणार असून त्यासाठी 9158437052 क्रमांकावर संपर्क साधावा. 21 रोजी रात्री 7.00 वाजता मुरगाव तालुका मर्यादित ‘गवळण गायन स्पर्धा’ होणार असून त्यासाठी 9158437052 क्रमांकावर संपर्क साधावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रीडा विश्वात खळबळ! इशान, अभिषेकसह भारताच्या चार खेळाडूंवर मॅच फिक्सिंगचा आरोप, बोर्डाकडून निलंबनाची कारवाई

वाठादेव येथे कचऱ्यामुळे रस्ताच गायब! रोगराईची भीती; बगलमार्गावरील सेवा रस्ता झालाय ब्लॅक स्पॉट

'भुय माझी भांगराची' नाटकाने जिंकली रसिकांची मने; ब्रह्माकरमळी, सत्तरी येथील ब्रह्मोत्सवात पर्यावरण, गाव रक्षणाचा संदेश

ZP Election: डिचोलीत 'झेडपी' उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे केले वाटप, 15 उमेदवार रिंगणात; पाळीत भाजप-काँग्रेसमध्ये लढत

पुरे झाली आता आश्‍‍वासने; भंगारअड्ड्यांसाठी धोरण ठरवा - संपादकीय

SCROLL FOR NEXT