Vasco State Bank of India Campus Dainik Gomantak
गोवा

Goa: पैसे घेऊन पळून जाणाऱ्या चोरट्यांना नागरिकांनी दिला बेदम मार

महिलेचे एटीएम कार्ड तसेच तिच्या हातातील अन्य सामान घेऊन पळ काढणाऱ्या दोघा चोरट्यांना सतर्क लोकांनी पकडून चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले.

दैनिक गोमन्तक

आता चोरट्यांच्या नजरा एटीएम मध्ये पैसे काढणार्‍यावर खिळल्या असून वास्कोत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका महिलेचे एटीएम कार्ड तसेच तिच्या हातातील अन्य सामान घेऊन पळ काढणाऱ्या दोघा चोरट्यांना सतर्क लोकांनी पकडून चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले.

सदर घटना 27 रोजी दुपारी 1.30 वाजता घडली. एक महिला येथील एफ एल गोम्स मार्गावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली असता तिच्या पाठोपाठ एटीएममध्ये घुसलेल्या दोघा तरुणांनी तिच्यावर पाळत ठेवून तिचा एटीएम कार्डचा कॉन्फिडन्सीयल नंबर नमूद करून नंतर तिच्या हातातील एटीएम कार्ड हिसकावून घेतले. तसेच तिच्या हातात असलेले अन्य सामान हिसकाऊन एटीएम मधून पळ काढण्यास सुरुवात केली. इतक्यात त्या महिलेने जोरात आरडाओरडा केल्याने, पळ काढणाऱ्या दोघा चोरट्यांना येथील सतर्क युवकांनी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पकडले. यावेळी लोकांची तिथे गर्दी जमली व त्या चोरांना बराच चोप दिला व त्यांना एटीएमकडे आणले.

त्या महिलेचे एटीएम कार्ड त्यांनी परत केले. दरम्यान या वेळी बँक कर्मचारी बाहेर धावून आले व त्यांनी चोरट्यांना एटीएममध्ये जखडून ठेवले.अन्यथा त्यांना लोकांचा आणखी चोप मिळाला असता. यावेळी पोलिसांना पाचारण केले. पोलिस घटनास्थळी अर्ध्या तास उशिरा पोहोचले. तोपर्यंत लोकांची एटीएम बाहेर गर्दी जमली. पोलीसांनी त्यांना गर्दीतून बाहेर काढले. अन्यथा लोकांचा त्यांना आणखी चोप मिळाला असता.

दरम्यान वाढत्या गुन्हेगारीमुळे लोक भयभीत झाले असून सोन साखळ्या खेचून पळ काढणे, पाकीट मार, तर आता एटीएम मध्ये प्रवेश करून एटीएम कॉन्फिडेनसियल नंबर नमूद करून कार्ड घेऊन पळ काढण्याचे चोरट्यांनी सुरू केले आहे. या घटनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT