भाजपच्‍या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज होत असून, त्यामध्ये गोव्यासह (Goa) पाच राज्यांच्या निवडणुकीबाबत तसेच इतर प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे.  Dainik Gomantak
गोवा

आजच्या बैठकीत भाजपची गोव्यासह पाच राज्यांच्या निवडणुकीची रणनिती ठरणार

ही बैठक सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत व्‍हर्च्युअल पद्धतीने आणि प्रत्यक्ष अशा हायब्रीड पद्धतीने दिल्ली आणि संबंधित राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी होणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपच्‍या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज होत असून, त्यामध्ये गोव्यासह (Goa) पाच राज्यांच्या निवडणुकीबाबत तसेच इतर प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासह भाजचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहे. यात प्रामुख्याने गोव्याच्या निवडणुकीची तयारी आणि रणनीतीवर विशेष चर्चा होईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनी दिली. या बैठकीमध्ये राज्यातील नऊ भाजप नेते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Vishwajeet Rane)आणि वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो प्रथमच राष्ट्रीय कार्यकारणीत सहभागी होत आहेत.

नव्या वर्षाच्या सुरुवातीला देशातील पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. त्‍यास गोव्यातून मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटनमंत्री सतीश धोंड, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आणि बाबू आजगावकर उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सीटी रवी हे दिल्लीतून या बैठकीत उपस्थित असतील. ही बैठक सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत व्‍हर्च्युअल पद्धतीने आणि प्रत्यक्ष अशा हायब्रीड पद्धतीने दिल्ली आणि संबंधित राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी होणार आहे.

दरम्‍यान, या बैठकीकडे गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण तीत काही महत्त्‍वपूर्ण निर्णय घेतले जाण्‍याची शक्‍यता आहे.

इंधन दरवाढ कमी : अभिनंदनाचा ठराव

देशभर वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आपले टॅक्स कमी केले आहेत. राज्यात पेट्रोल 11.41 रुपये तर डिझेल 16.79 रुपयांनी कमी झाले आहे. त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार असून केंद्राने एक लाख कोटी रुपयांचा महसूल सहन करून जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे त्यामुळे त्यांच्या अभिनंदनाचा ठराव या कार्यकारिणीत मांडला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT