Goa CM Pramod Sawant Twitter/@DrPramodPSawant
गोवा

Industries In Goa: IPB च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत गोव्यात नव्या आठ उद्योगांना मान्यता, CM सावंत यांची घोषणा

गोवा-IPB च्या 31 व्या बोर्ड बैठकीचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 1,128 कोटींच्या प्रस्तावित गुंतवणुकीच्या 8 प्रकल्पांना मान्यता दिली आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा-IPB च्या 31 व्या बोर्ड बैठकीचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 1,128 कोटींच्या प्रस्तावित गुंतवणुकीच्या 8 प्रकल्पांना मान्यता दिली आहे. तब्बल 4526 व्यक्तींच्या रोजगाराची क्षमता असलेला हा प्रकल्प आहे.

(In the recent meeting of IPB, eight new industries were approved in Goa)

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या (IPB) नुकत्याच झालेल्या बैठकीत गोव्यात नव्या आठ उद्योगांना मान्यता देण्यात आली आहे. त्यातून राज्यात 1,128 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, 4,526 जणांना रोजगार मिळू शकणार आहे. अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ३१वी बैठक झाली. राज्यात पर्यावरणपूरक उद्योग असावेत, असे धोरणही पुढे नेण्यात येत आहे.

गोव्यातील उत्पादने देशभर नेण्यासाठी GEM वर नोंदणी करण्याचे मुख्यमंत्री सावंत यांचे आवाहन

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवासियांना त्यांची उत्पादने देशभर नेण्यासाठी सरकारी ई मार्केटप्लेस (GEM) वर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे; अन्न असो वा इतर कोणतेही उत्पादन, हे पोर्टल अखिल भारतीय बाजार स्तरावर उत्पादन घेते अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली; ते पुढे म्हणाले, आपण कौशल्य प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे तसेच डिजिटलायझेशन किती आवश्यक आहे याचे महत्व त्यांनी पटवून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT