karapur river Mandola Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : कारापूर नदीत यंदाही ‘मांडोळ्यांच अमाप पीक

रुचकर मांस; नदीवर होतेय खवय्यांची मोठी गर्दी

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली तालुक्यातील कारापूर येथे नदीपात्रात यंदाही मोठ्या प्रमाणात दुर्मीळ मांडोळ्यांचे पीक आले आहे. रुचकर असलेल्या या मांडोळ्या नदीतून काढण्यासाठी सध्या नदीवर खवय्यांची गर्दी उसळत आहे.

कारापूर येथील ‘कोळशेकात्र’ परिसरात या मांडोळ्यांचे अमाप पीक आले आहे. गेल्या कैक वर्षांपासून दरवर्षी कारापूर नदीत हे पीक येते. मध्यंतरी दोन-तीन वर्षे मांडोळ्यां गायब झाल्या होत्या.

नदीत मांडोळ्यांची उत्पती झाल्याचा अंदाज येताच त्या काढण्यासाठी खवय्यांची नदीवर झुंबड उडते. पावसाने कृपा केल्यास साधारण महिनाभर मांडोळ्यांचा मोसम असतो. सध्या मांडोळ्या काढण्यासाठी कारापूरसह सर्वण, बागवाडा आदी भागातील महिलांसह खवय्ये नदीवर गर्दी करीत आहेत.

मांडोळ्यांचे कवच एकदम नाजूक असल्याने मांस वेगळे करताना मोठेसे कष्ट घ्यावे लागत नाही. त्याच्यापासून आंबट-तिखट बनविता येते. मांडोळ्यांचे मांस रुचकर असल्याने खवय्ये त्‍यापासून बनविलेल्या पदार्थाला पसंती देऊन आवडीने आस्वाद घेतात.

दरम्‍यान, मांडोळ्या हा एक शिंपल्यातील प्रकार असून, त्या साधारण तिसऱ्यासारख्याच दिसतात. या मांडोळ्या नदीच्या गाळात रुतलेल्या असतात.

खुब्यांची उत्पती झाली बंद

मांडोळ्यांची उत्पत्ती सुरू झाल्यापासून खुब्यांच्या पिकावर मात्र परिणाम झाला आहे. पंचवीस वर्षांपूर्वी कारापूर नदीत मोठ्या प्रमाणात काळे खुबे पडत होते. मात्र कालांतराने ते बंद झाले आहेत, अशी माहिती जाणकारांकडून देण्‍यात आली. खुब्यांची उत्पत्ती बंद होण्यामागे मांडोळ्या हे एक कारण असू शकते, असाही त्‍यांचा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT