Captain Viriato  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विरिएतो यांच्या भेटीगाठी सुरू

Goa Congress: काँग्रेसचे दक्षिण गोव्‍यातील संभाव्‍य उमेदवार असलेले कॅप्‍टन विरिएतो फर्नांडिस यांनी शिमग्याचे निमित्त साधून दक्षिण गोव्‍यातील काही गावांना भेटी देण्‍यास सुरवात केली असली, तरी हा त्यांचा वैयक्तिक पातळीवरील प्रचार म्‍हणावा लागेल.

दैनिक गोमन्तक

Goa Congress:

काँग्रेसचे दक्षिण गोव्‍यातील संभाव्‍य उमेदवार असलेले कॅप्‍टन विरिएतो फर्नांडिस यांनी शिमग्याचे निमित्त साधून दक्षिण गोव्‍यातील काही गावांना भेटी देण्‍यास सुरवात केली असली, तरी हा त्यांचा वैयक्तिक पातळीवरील प्रचार म्‍हणावा लागेल.

मात्र, एकटे कॅप्‍टन विरिएतो फर्नांडिस सोडल्‍यास बाकीच्यांचा लाेकांमध्‍ये अजून हवा तसा वावर दिसत नाही. कॅप्‍टन फर्नांडिस यांनी शिमग्याच्‍या निमित्ताने केपे मतदारसंघातील खोल आणि अन्‍य गावांना भेटी देऊन लोकांशी संवाद साधला.

यावेळी त्‍यांच्‍यासोबत केपेचे आमदार एल्‍टन डिकॉस्‍ता आणि दक्षिण गोवा काँग्रेस अध्‍यक्ष सावियो डिसिल्‍वा होते. या भागातून काँग्रेसला लोकांचा चांगला प्रतिसाद असल्‍याचा दावा फर्नांडिस यांनी केला.

यावेळी एका काँग्रेस कार्यकर्त्याने सांगितले की, खोल आणि केपेतील अन्‍य भाजप कार्यकर्त्यांचाही यावेळी काँग्रेसला पाठिंबा मिळणार, असे वाटते. कारण या भागातील भाजप कार्यकर्त्यांना ही उमेदवारी नरेंद्र सावईक़र यांना द्यायला हवी होती. त्‍यांच्‍या मनासारखे न झाल्‍याने त्‍यांच्‍यात नाराजी निर्माण झाली आहे. त्‍याचा फायदा काँग्रेसला होईल, असे त्‍यांनी सांगितले.

प्रत्येकाचा सवता सुभा

गिरीश चोडणकर यांनीही वैयक्‍तिक स्‍तरावर लोकांच्‍या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. तर खासदार फ्रान्‍सिस सार्दिन हे फोनवरून लोकांच्‍या संपर्कात आहेत. या सर्व स्‍थितीवर भाष्‍य करताना काँग्रेसचे नेते एल्‍वीस गोम्‍स म्हणाले,

वास्‍तविक आतापर्यंत काँग्रेस उमेदवार जाहीर होऊन तो लोकांपर्यंत पोचणे आवश्‍‍यक होते. दुर्दैवाने तसे झालेले नाही. तुमचा उमेदवार कोण, असे आम्‍हाला लोक विचारू लागले आहेत. असे जरी असले सध्या जो काही वेळ आहे, त्‍यात काँग्रेसचा उमेदवार लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेेचे आहे, असे मत व्‍यक्‍त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT