Goa School Oppose Raksha Bandhan Dainik Gomantak
गोवा

Ponda News: विद्यार्थ्यांना हातावर बांधलेली राखी काढायला लावली; फोंड्यातील शाळेत प्रकार

रणरागिनी संघटना आक्रमक; दोषींवर कडक कारवाईची मागणी

गोमंतक ऑनलाईन टीम

Ponda News: फोंडा तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणानिमित्त हातावर बांधण्यात आलेली राखी काढण्यास सांगितल्याचा प्रकार समोर आला आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना हातावरील राखी काढायला लावली गेल्याचे समोर येताच आता पालकांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

रक्षा बंधन हा हिंदुंचा पवित्र सण आहे. काही शाळांकडून जाणीवपूर्वक हिंदु सणांना कमी महत्व दिले जात असल्याच्या तक्रारी गोव्यात होत असतात. दरम्यान, फोंडा तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थ्यांना राखी हातावरून काढायला लावल्याचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

रक्षा बंधन सणाला आता काही दिवस उलटून गेले आहेत. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. काही विद्यार्थी रक्षा बंधनानिमित्त बहिणीने बांधलेली राखी बांधून शाळेत गेले होते. पण तिथे त्यांना राखी काढायला लावली गेली.

विद्यार्थ्यांनी हा प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर गोवा रणरागिनी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

रणरागिनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानेही याबाबत एक परिपत्रक काढले आहे. त्यांनीही अशा पद्धतीने मुलांना राखी काढायला लावणे हा गुन्हा आहे, असे म्हटले आहे.

त्यामुळे या शाळेने सर्व पालकांची माफी मागितली पाहिजे. इतकेच नाही तर हिंदुंची क्षमा त्यांनी मागितली पाहिजे. तसेच यात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी रणरागिनी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT