CM Pramod Sawant: बेरोजगारी नाहीच! ज्याला गरज आहे, त्याच्यासाठी गोव्यात काम आहे...

राज्यात विद्या समिक्षा केंद्राची सुरवात करणार; मुख्यमंत्री वसिष्ठ गुरू पुरस्काराचे वितरण
CM Pramod Sawant:
CM Pramod Sawant:Dainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant Teachers Day Award: गोव्यातील शैक्षणिक पायाभूत सुविधा इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत सर्वाधिक चांगल्या आहेत. गोव्यात बेरोजगारी नाही. ज्याला गरज आहे, त्याच्यासाठी येथे काम आहे, असे सांगतानाच राज्यात विद्या समिक्षा केंद्राची सुरवात करणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री वसिष्ठ गुरू पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. हर्षिता नाईक, सोनिया माणगावकर, प्रेमानंद नाईक, आंतोनेत डिसोझा, सुचित्रा देसाई, उमेशा देसाई, डॉ. नीता साळुंके, दत्ता परब या शिक्षकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, गोव्यातील सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले, तर आमचे विद्यार्थी कुठेच कमी पडणार नाहीत. सर्व क्षेत्रात ते राष्ट्रीय पातळीवर पुढे येतील. त्यासाठी त्यांना केवळ एक पुश देण्याची गरज आहे. काही इनोव्हेटिव्ह करण्याची गरज आहे. पुरस्कार विजेत्या शिक्षकांकडून प्रेरणा घ्यावी.

CM Pramod Sawant:
Chorao Ferry Boat: चोडण येथे फेरीबोटीचा तराफा तुटला; बोटीतच अडकून पडले प्रवासी

पंतप्रधानांचे स्वप्न आहे की 2047 मध्ये भारत विकसित असेल. त्याचा पाया शिक्षकांनी आत्ता घालायला हवा. आता गोव्यात बेकारी आहे, असे सांगितले जाते. पण गोव्यात बेकारी नाही. ज्याला काम करायचे आहे, त्याच्यासाठी गोव्यात काम आहे.

कौशल्य आणि करीयर क्षेत्रात योग्य काम केले तर आगामी काळात कुणीही बेरोजगार राहणार नाही. शिक्षणातील पायाभूत सुविधांमध्ये गोवा पुढे आहे. यात कुणीही आपल्याला चॅलेंज करू शकत नाही. आम्ही केवळ इमारती बांधत नाही तर सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा येथे चांगल्या आहेत. कोडिंग आणि रोबोटिक्स सारखे विषय शाळेत शिकवणारे गोवे हे पहिले राज्य आहे.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, पुरस्कार विजेत्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन. ज्यांना पुरस्कार मिळालेला नाही, त्यांनी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. त्यांनी पुन्हा या पुरस्कारासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठीही कमी शिक्षक अर्ज करतात.

पुढील पिढी शिक्षकच घडवू शकतात. पालकांपेक्षाही शिक्षक महत्वाचा असतो. ग्रामीण भागात तर शिक्षक खूप महत्वाचा ठरतो. मुलांच्या करियर घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे.

आधी विविध ऑप्शन्स शिक्षक स्वतः शिकतात आणि ते विद्यार्थ्यांना शिकवतात. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतून सरकारने अनेक ऑप्शन्स उपलब्ध करून दिले.

CM Pramod Sawant:
Chorao Ferry Boat: चोडण येथे फेरीबोटीचा तराफा तुटला; बोटीतच अडकून पडले प्रवासी

गोव्यातील सर्वात मोठे क्षेत्र जर कोणते असेल तर तरे टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी हे आहे. गोव्यातील शिक्षकांनी याची नोंद घ्यावी. या क्षेत्रात मनुष्यबळ विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. प्रत्येक आयटीआयमध्ये आम्ही हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत.

नवे शिक्षण धोरण राबविणारे गोवा पहिले राज्य. आपण इतर राज्यांच्या एक पाऊल पुढे आहोत. फाऊंडेशन कोर्स आम्ही सुरू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल असणार आहेत. कौशल्य विकासावर आम्ही भर दिला आहे.

विशेष मुलांना घेऊन परदेशात जाऊन पदक जिंकून आणणाऱ्या शिक्षकांचे विशेष अभिनंदन. हे सोप्पे नाही. स्पेशल शाळांच्या व्यवस्थापनाचेही अभिनंदन.

विद्या समिक्षा केंद्र

ते म्हणाले, लवकरच विद्या समिक्षा केंद्राची सुरवात करणार. विद्यार्थ्याचे पहिलीपासूनच्या शिक्षणाचे मॉनिटरिंग पणजीतील मुख्य कार्यालयातून केले जाईल. प्रत्येक शिक्षकाचेही मॉनिटरिंग करता येणार आहे. शाळेतले विद्यार्थी किती मागे आहेत, हे देखील त्यातून कळेल.

दर महिन्याला विद्यार्थ्याचे रीपोर्ट कार्ड मिळेल. या सर्व उपक्रमांसाठी शिक्षकांचा पाठिंबा असणे गरजेचे असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com