In Goa, the Congress party has now handed over the responsibility to the youth Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

कामतांकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात होते, मात्र...

लोबो आणि पाटकर यांनी मडगावात घेतली भेट

दैनिक गोमन्तक

मडगाव : काँग्रेस पक्षाने पक्ष कार्याची धुरा नवीन पिढीकडे दिली आहे ही स्वागतार्ह बाब आहे. मी या धोरणाचे स्वागतच करतो, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि मावळते विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली. आज काँग्रेसचे विधिमंडळ नेते मायकल लोबो आणि प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिगंबर कामत यांची मडगावात भेट घेऊन त्यांची केंद्रीय समितीवर नेमणूक झाल्याने त्यांचे अभिनंदन केले.

दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्याकडे भावी मुख्यमंत्री (CM) म्हणून पाहिले जात होते. मात्र, शेवटी त्यांना विरोधी पक्षनेतेपदही मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर त्यांचे मत विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले.

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना नवीन विधिमंडळ नेते मायकल लोबो यांनी आमच्या पुढील वाटचालीसाठी आम्हाला दिगंबर कामत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद पाहिजे यासाठीच आम्ही इथे आलो आहोत, असे सांगितले.

आलेक्स सिक्वेरा यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना बदलून त्यांच्या जागी युरी आलेमाव यांना कार्याध्यक्षपदी नेमण्याचे कारण काय असे विचारले असता, सासष्टी हा काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही काही कारणास्तव या तालुक्यात मतदार काँग्रेसपासून (Congress) दूर गेले. युरी आलेमाव हे सासष्टीचा चेहरा असून ते मतदारांना काँग्रेसकडे आणणार ही आम्हाला खात्री आहे, असे लोबो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT