Goa Assembly Dainik Gomantak
गोवा

गोवा: विधानसभेचे आज विशेष अधिवेशन

हंगामी सभापतीपदी गणेश गावकर

दैनिक गोमन्तक

पणजी:  सातव्या विधानसभेची मुदत 16 मार्च रोजी संपत आहे. तत्पूर्वी, नवीन विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. यासाठी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी आपल्या विशेषाधिकारांचा वापर करीत आज मंगळवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनासाठी सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांची हंगामी सभापती म्हणून निवड केली आहे.

सोमवारी सकाळी राज्यपालांनी गावकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, विधानसभा सचिव नम्रता उलमन उपस्थित होते.

मंगळवारी सकाळी 11.30 वाजता हे विशेष अधिवेशन होणार आहे. यात प्रामुख्याने राज्यात नव्याने निवडून आलेल्या सर्व आमदारांच्या आमदारकीची शपथ ग्रहण सोहळा होईल. दरम्यान, गोव्‍यात पक्षांतर्गत वाद वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात नेता निवडीबाबतही मतभेद असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे असल्याने राज्यपालांनी अधिकाराचा योग्य वापर करत हे अधिवेशन बोलाविले आहे.

राज्यपालांनी आमदार शपथग्रहण सोहळ्यासाठीच्या विशेष अधिवेशनाकरिता माझी हंगामी सभापती म्हणून नेमणूक केली आहे. मात्र, विधानसभेच्या सभापतीची नेमणूक विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर विधिमंडळातील सदस्य करतील. सध्या राज्यपालांनी दिलेले काम आपण पार पाडत असून यापुढेही पक्षाने दिलेले काम निष्ठेने करीन.

- गणेश गावकर, हंगामी सभापती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

SCROLL FOR NEXT