Petrol- Diesel Pump  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पेट्रोल 12 , तर डिझेल 17 रुपयांनी स्वस्त

केंद्र सरकार नंतर गोवा सरकारनेही जनतेला दिलासा देताना पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर प्रत्येकी 7 रुपयांनी कमी केला

Dainik Gomantak

New Delhi/Goa: काही महिन्यांपासून महागाईचा सामना करणाऱ्या राज्यातील जनतेला केंद्र आणि राज्य सरकारनेही (Goa Govt) दिवाळीची भेट (Diwali Gift) देताना पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले आहेत. केंद्र सरकारने (Central Govt) पेट्रोलवरील अबकारी करात 5 तर डिझेलमध्ये 10 रुपयांची कपात केली आहे.

त्यानंतर गोवा सरकारनेही जनतेला दिलासा देताना पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर प्रत्येकी 7 रुपयांनी कमी केले आहेत. त्यामुळे ही दिवाळी गोमंतकीयांसाठी गोड ठरली आहे. आता राज्यात पेट्रोलचे दर 12 तर डिझेलचे दर 17 रुपयांनी घटले आहेत. उद्यापासून गुरुवार या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. राज्यांनीही मूल्यवर्धित कर कमी करण्याचा आवाहन अर्थ मंत्रालयाने केले आहे.

‘‘अनेक राज्यांतील निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर व कॉंग्रेस पक्षाने केलेल्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे असंवेदनशील भाजप सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर प्रत्येकी 5 व 10 रुपयांनी कमी केला. हा निर्णय पुरेसा नाही. पंतप्रधान स्वयंपाक गॅसच्या किमती कमी करणार का?

- दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

‘‘ ऐन दिवाळीला पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी करून पंतप्रधानांनी सामान्य जनतेला दिलासा दिला आहे. याबद्दल मी नरेंद्र मोदीजींचा आभारी आहे. राज्य सरकारनेही जनतेला दिवाळी भेट देताना पेट्रोल, डिझेलचे दर आणखी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारही पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येकी 7 रुपयांनी कमी करीत आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT