Goa panchayat election News | Churchill Alemao Latest News Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat: पंचायत प्रभाग रचना कायद्यानुसार करा अशी आलेमाव यांची मागणी

बाणावली मतदारसंघातील अनेक पंचायतींनी प्रभाग रचना प्रक्रियेसंबंधी नापसंती व्यक्त केली

दैनिक गोमन्तक

सासष्टी: बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी पंचायत प्रभाग रचना ही कायद्यानुसार करावी, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण ही मागणी केल्याचे आलेमाव यांनी सांगितले.

बाणावली मतदारसंघातील अनेक पंचायतींनी प्रभाग रचना प्रक्रियेसंबंधी नापसंती व्यक्त केली आहे. विरोधही केल्याचे आलेमाव म्हणाले. अनेक पंचायतींनी हरकती नोंदवलेल्या आहेत. आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना हरकती सादर करणार असल्याचेही आलेमाव यांनी सांगितले. (Goa panchayat election News Updates)

पंचायत प्रभाग रचना करताना सरपंच व पंचांना विश्र्वासात घेतलेले नाही. करमोणा, केळशी, सुरावली या पंचायतींनी हरकती नोंद केल्याचे आलेमाव म्हणाले. निवडणुकीच्या निकालानंतर आपण यासंबंधी दिशा ठरवणार आहे. तसेच या निवडणुकीत आपणच बाणावलीतून जिंकू, असा विश्र्वासही आलेमाव यांनी व्यक्त केला. (Churchill Alemao Latest News Updates)

करमोणामध्ये जवळजवळ असलेल्या भागांना एकत्रित न करता, लांब वस्ती असलेले भाग जोडण्यात आले आहेत, अशी माहिती करमोणाचे सरपंच सेंड्रा फर्नांडिस यांनी दिली.प्रभाग रचना करताना स्थानिकांचा विचार करण्याची गरज असल्याचे केळशीचे माजी सरपंच दियोनिझियो डायस यांनी सांगितले.

सुरावलीचे सरपंच लेस्ली दौरादो म्हणाले, की प्रभाग रचनेत बदल करण्याची गरज नाही. जसा आहे तसेच प्रभाग ठेवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT