Catch the Rain Dainik Gomantak
गोवा

गोव्यात ‘कॅच द रेन’वर देणार भर..!

मंत्री शिरोडकर यांचे निर्देश: गोवा पाण्याबाबतीत स्वयंपूर्णतेसाठी प्रयत्न

दैनिक गोमन्तक

फोंडा: इंधनाप्रमाणे पाण्यालाही मोठी किंमत येणार आहे. केवळ देशातीलच नव्हे, तर जगभरातील पाण्याचे स्त्रोत कमी होऊ लागले असून पाणी वाचवले तरच जीवन वाचेल, असा मंत्रच आता परदेशातील बड्या राष्ट्रांनी दिला आहे. पाणी वाचवण्यासाठी मोठ्या क्लृप्त्याही या राष्ट्रांनी शोधून काढायला सुरवात केली असून इंधनाप्रमाणे पाणीही उद्या परकीय देशांना विकावे लागेल, याचा अंदाज आल्यानेच आता ‘मिशन जल’ अभियान सगळीकडे सुरू झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी पाण्याच्या समस्येची गंभीर दखल घेत आपल्या खात्यामार्फत पाण्याच्या संवर्धनासाठी जलशक्ती अभियानद्वारे मोठी पावले उचलली आहेत.

जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी राज्यातील जलस्त्रोत खाते तसेच कृषी खात्यातील काही अधिकाऱ्यांची सिंचन भवनमध्ये एक बैठक बोलावून राज्यातील पाण्याचा साठा, जलस्त्रोतांची ठिकाणे आणि पावसाच्या पाण्याचा अंदाज व वापर यासंबंधी चर्चा केली. विशेषतः पावसाच्या पाण्याचा योग्य वापर झाला, तर गोवा पाण्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण होईलच, पण मुबलक पाण्याचा साठाही उपलब्ध होईल, असा दावा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केला असून पावसाच्या पाण्याचे तसेच आहे त्या जलस्त्रोतांचे योग्य नियोजन करण्याचे आदेश या खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो. मागच्या तीन वर्षांचा आढावा घेतला, तर दीडशे इंचांपर्यंत पावसाची मजल गेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असला तरी हे पाणी वाहून वाया जात असल्याने भविष्यात या पाण्याची तरतूद करणे शक्य होत नाही. त्यामुळे या पाण्याचा योग्य वापर करून पाण्याचे दुर्भिक्ष्य संपवण्याचा इरादा जलस्त्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT