Senior citizen News, Goa Election Result 2022 News, Senior Citizens votes Disqualified News  Dainik Gomantak
गोवा

Goa Election2022: मतमोजणीत ज्येष्ठ नागरिकांची 2500 मते ठरवली बाद

मडगाव शॅडो कौन्सिल: त्वरित चौकशी करण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

सासष्टी: यंदा प्रथमच निवडणूक आयोगाने घरीच राहून मतदान करण्याची संधी ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांना दिली. त्याप्रमाणे हजारो ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा फायदा घेत मतदानात भाग घेतला. मात्र, मतमोजणीवेळी ही मतेच मोजण्यात आली नाहीत. अंदाजे 2500 मते बाद ठरवण्यात आली, हे असे का घडले. यात कुणाची चूक किंवा अशाप्रकारचा गोंधळ मुद्दाम करण्यात आला का? याची चौकशी करावी, अशी मागणी शॅडो कौन्सिलने मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल (आयएएस) यांना पत्र लिहून केली आहे, अशी माहिती कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्या समवेत अखिल गोवा ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष डायगो एम. डिकॉस्टा व सरचिटणीस . निक कुलासो उपस्थित होते. (Goa Election Result 2022 News)

सरकारी अधिकाऱ्यांनी, बीएलओ तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींनी ठरवलेल्या दिवशी व वेळेत मतदानासाठी नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरी जाऊन त्यांची मतपत्रिका घेतली. या मतपत्रिका गुलाबी लिफाफ्यात सीलबंद करण्यात आल्या. हा लिफाफा, त्यासोबत असलेला डिक्लेरेशन फॉर्म मोठ्या लिफाफ्यात सीलबंद करण्यात आला. मतपत्रिकेवर नंबर होता व तोच नंबर ज्या लिफाफ्यात बंद करण्यात आला, त्यावरसुद्धा तो अधिकाऱ्यांनी घालायचा होता. मात्र, जेव्हा मतमोजणी केंद्रावर हे लिफाफे मते मोजण्यासाठी काढण्यात आले, तेव्हा मतमोजणी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले, की मतपत्रिका व लिफाफ्यावरील नंबर भिन्न होते. त्यामुळे ही मते मोजण्यात आली नाहीत.

जर प्रत्येक मतदारसंघात एक दोन लिफाफे सापडले असते, तर चूक म्हणून समजले असते. पण प्रत्येक मतदारसंघात अशाप्रकारची 160 ते 190 च्या आसपास मते बाद जाहीर करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण गोव्यात कमीत कमी अडीच हजाराच्या आसपास मते बाद ठरविण्यात आली. हा ज्येष्ठ नागरिकांवर झालेला अन्याय असल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले. ज्यांचे क्रमांक समान आढळले त्यांची मते विचारात घेण्यात आली.आम्हाला ही माहिती फॉर्म नंबर 20 (अंतिम निकाल पेपर) याद्वारे मिळाली, असेही कुतिन्हो यांनी स्पष्ट केले.

...तर कमी फरकाने पराभूतांना लाभ

काही उमेदवार अगदी कमी फरकाने निवडून आले, त्यांना कदाचित अशा मतांचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही कुतिन्हो म्हणाले. मतदानाचा दिवस व मतमोजणीचा दिवस यामध्ये मोठा फरक असल्याने अशाप्रकारची कारस्थाने करण्यास वाव मिळाला असेल, अशी शक्यताही कुतिन्हो यांनी व्यक्त केली. लिफाफ्यावर मतदान पत्रिकेचा नंबर सरकारी अधिकाऱ्यांनी लिहायचा होता. मध्यंतरी सरकारी अधिकाऱ्यांवर मोठा दबाव टाकण्यात आल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे हे प्रकरण मुद्दाम करण्यात आल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT