Goa congress Dainik Gomanatk
गोवा

Goa Congress: काँग्रेस नेत्यांमधील धुसफूस रोखण्यात प्रभारी अपयशी

Goa Congress: सुंदोपसुंदी : लोकसभेसाठी संघटितपणे काम कसे करणार?

दैनिक गोमन्तक

Goa Congress: विधानसभेच्या निवडणुका होऊन दीड वर्षे झाले, त्यानंतर नव्याने निवडलेले काँग्रेस प्रभारी मणिक्कम टागोर यांना पक्षांतर्गत दोन गटांमधील धुसफूस रोखण्यात अपयश आले आहे. गिरीश चोडणकर आणि अमित पाटकर या आजी-माजी प्रदेशाध्यक्षांच्या समर्थकांनी टागोरांपुढे आज एकमेकांची उणीदुणी काढली.

त्यामुळे हा पक्षांतर्गत वाद जरी असला तरी लोकसभा निवडणुकीत हे गट कसे एकत्रितरित्या काम करणार, हा मोठा प्रश्‍न टागोर यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या टागोर यांनी गुरुवारी सायंकाळी दोन तास मतदारसंघ प्रभारींची झाडाझडती घेतली. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना पक्षाचे कार्य प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कसे चालले आहे, याविषयी त्यांनी प्रत्येकाकडून आढावा घेतला.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, आमदार कार्लुस फेरेरा यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या पक्ष कुठे आहे, याची माहिती टागोरांसमोर ठेवली.

पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची एक-एक करून टागोर यांनी मते जाणून घेतली. त्यात त्यांना पक्षांतर्गत काही धुसफूस थांबली नसल्याचे पुन्हा जाणवले. त्यामुळे वर्ष ओलांडून गेले तरी टागोर यांना स्थानिक नेत्यांमधील धुसफूस मिटवण्यात अपयश आले आहे,

असा संदेश समाजमानसात जात आहे. यावर त्वरित तोडगा काढून लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्ष भक्कमपणे उभा असल्याचे चित्र निर्माण करण्याचे काम टागोर यांना करावे लागणार आहे.

टागोर दिल्लीला रवाना

दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आलेले कॉंग्रेस प्रभारी मणिक्कम टागोर हे शुक्रवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले.

भाजपची कारस्थाने जनतेसमोर मांडणार : टागोर

भाजप सरकारचा भ्रष्टाचार, नोकर भरतीतील घोटाळा, बेरोजगारी अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेस पक्षाने आवाज उठवला आहे आणि हेच मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. भ्रष्टाचारात मिळविलेल्या पैशाने सरकार टिकवण्यासाठी आमदारांची खरेदी करण्याचे काम भाजपने केले. नोकर भरती घोटाळाप्रकरणी आम्ही लोकायुक्तांकडे तक्रार करणार आहोत. तसेच भाजपचेे सर्व घोटाळे समाजासमोर मांडणार असल्याचे टागोर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जागा दोन, उमेदवार चार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक-एक करून मते जाणून घेत असताना उत्तर गोवा माजी जिल्हाध्यक्ष विजय भिके, ज्येष्ठ नेते ॲड. रमाकांत खलप यांनी उत्तर गोव्यातून लोकसभेसाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणीही पुढे रेटली. त्याशिवाय दक्षिण गोव्यातून एल्विस गोम्स, कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे टागोर यांना सांगितले आहे.

गटबाजीवर संतापले 3 आमदार

आमदार युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्ता, कार्लुस फेरेरा यांनी पक्षाच्या कामामध्ये होत असलेल्या गटबाजीबद्दल ठामपणे आपली मते मांडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही त्याच स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आल्याने टागोर नेमके काय सत्य आहे, हे समजून चुकले. त्यामुळे ते परवा पक्षश्रेष्ठींना कोणता अहवाल सादर करणार, हे जणू आजच स्पष्ट झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT