emergency Phone Dainik Gomantak
गोवा

Monsoon 2023: गोव्यात मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क; आपत्कालीन परिस्थितीत या क्रमांकावर करा फोन

येत्या 48 तासांत मॉन्सून गोव्यात धडकणार असल्याची शक्यता

Rajat Sawant

Goa Government On Monsoon : शुक्रवारी रात्रीपासून मॉन्सूनपूर्व सरींचा राज्यातील विविध भागांत शिडकाव सुरू झाला आहे. तसेच आज शनिवारीही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

दरम्यान येत्या 48 तासांत मॉन्सून गोव्यात धडकणार असल्याची शक्यता हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात आली आहे. तसेच गोव्याला बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रशासनातर्फे आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र खवळलेला असून गोव्याच्या किनारपट्टीवर उंचच उंच लाटांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गोव्यातील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आतापर्यंत सर्वाधिक पेडणे, त्याखालोखाल म्हापसा, पणजी, साखळी, काणकोण, दाबोळी, मुरगाव, सांगे आदी भागांत मॉन्सूनपूर्व पाऊस पडल्याचे निरीक्षण गोवा वेधशाळेने नोंदवले आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गोवा राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने सतर्कतेचा ईशारा दिला असला, तरी नागरिकांनी घाबरू नये. मात्र, समुद्र किनाऱ्यावर स्नानासाठी जाऊ नये, तसेच बोटी व लहान जहाजे न चालविण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्रशासनातर्फे आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

उत्तर गोवा आपत्कालीन संपर्क क्रमांक

उत्तर गोवा जिल्हा नियंत्रण कक्ष

तिसवाडी - 0832 - 2225383 / 0832 - 2426578

सत्तरी - 0832 - 2374090 / 8262051992

डिचोली - 0832- 2362237 / 8799937644

पेडणे - 9067910323

बार्देश - 8055665335

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT