डिचोली-झेंडू फुलांनी बहरलेला नानोडा येथील एक मळा. Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत झेंडू फुलांचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले

झेंडू फुलांना बाजारपेठ मिळावी.म्हणून गोवा (Goa) फलोत्पादन महामंडळाला (Horticulture Corporation) प्रस्ताव देण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: यंदा उशिराने का होईना, आता डिचोलीत झेंडू फुलांचे (Marigold flowers) मळे केशरी-पिवळ्या फुलांनी पूर्ण बहरले असून, दिवाळी (Diwali) सणाला स्थानिक मळ्यांनी फुललेली झेंडुंची फुले उपलब्ध होणार आहेत. दसऱ्याला नाही, तरी आता दिवाळीला फूले मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. असंतुलित पावसामुळे यंदा झेंडू फुलांचा बहर लांबणीवर पडला होता. डिचोली विभागीय कृषी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दिवाळीला एक टनहून अधिक झेंडू फूले मिळणार असल्याचा अंदाज आहे.

दसऱ्यात तुडवडा

कृषी खात्याच्या 'आत्मा' योजनेंतर्गत यंदा डिचोलीत 'झेंडू'ची दुप्पट लागवड करण्यात आली असली, तरी गेल्या महिन्यात साजरा झालेल्या दसरा सणावेळी 'झेंडू'चे मळे फुलांनी बहरलेले नव्हते. त्यामुळे यंदा ऐन दसरा सणात स्थानिक जमिनीत फुललेली झेंडूची फुले दुर्मिळ झाली होती. परिणामी डिचोलीवासियांना राज्याबाहेरून येणाऱ्या झेंडू फुलांवरच अवलंबून रहावे लागले होते.

अडीज हेक्टर क्षेत्रफळात लागवड

कृषी खात्याच्या सहकार्याने यंदा बोर्डेसह साळ, पिळगाव, मये आदी भागात मिळून डिचोलीत 25 हजार चौरस मीटर अर्थातच अडीज हेक्टर जमीन झेंडू लागवडीखाली आली आहे. जवळपास 30 शेतकऱ्यांनी (farmers) ही लागवड केली आहे. यंदा स्थानिक नर्सरीतून झेंडूची रोपटी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र असंतुलित पाऊस आणि लागवडीस झालेल्या उशिरामुळे फुलांच्या बहरावर परिणाम झाला आणि फूले फुलण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली. अशी माहिती कृषी खात्याकडून उपलब्ध झाली आहे.

बहर समाधानकारक

यंदा 'झेंडू'ची लागवड जवळपास एक महिना उशिराने झाली आहे. त्यामुळे फुले फुलण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली गेल्या वर्षी ऐन दसरोत्सवात मळे झेंडू फुलांनी बहरले होते. उशिराने का असेना, आता झेंडू फुलांचा बहर समाधानकारक आहे.

निलिमा गावस, विभागीय कृषी अधिकारी यांचे बाजारपेठेसाठी प्रयत्न

झेंडू फुलांना बाजारपेठ मिळावी.म्हणून गोवा फलोत्पादन महामंडळाला प्रस्ताव देण्यात आला आहे. अजून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. तूर्तास बाजारात फुले विकणाऱ्या अश्वेता खांबल (पळ), तांत्रिक व्यवस्थापक यांनी विक्रेत्यांचे संपर्क नंबर शेतकऱ्यांना दिलेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT