Police Danik Gomantak
गोवा

Goa Crime: दक्षिण गोव्यातील गुन्हेगारी घटनांबाबत पोलीस अधिक्षकांची महत्वाची माहिती, म्हणाले..

यंदाचे खुनांच्या घटनांचे प्रमाण 72 टक्क्यांनी कमी झाले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा दक्षिण गोव्यातील गुन्हेगारीच्या प्रकरणात घट झाली आहे. दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अभिषेक धनीया यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा जानेवारी ते मे या पाच महिन्यात दक्षिण गोव्यात फक्त 3 खून झाले आहेत.

मागच्या वर्षी पहिल्या पाच महिन्यांत या जिल्ह्यात 11 खूनांची नोंद झाली होती. या दोन्हीं वर्षांची तुलना केल्यास यंदाचे खुनांचे प्रमाण 72 टक्क्यांनी खाली उतरले आहे.

दक्षिण गोव्यात एकूणच गुन्हेगारी घटनांत घट झाली आहे. चालू वर्षात जानेवारी ते मे या पाच महिन्यात जिल्हयात गुन्हेगारी प्रकरणे 359 घडली. मागच्या वर्षी या पाच महिन्यात हा आकडा 561 इतका हाेता असे त्यांनी सांगितले. गुन्हेगारी प्रकरणात मागच्या वर्षाच्या तुलनेत 36टक्के घट झाल्याचे ते म्हणाले.

गेल्या वर्षात जानेवारी ते मे या दरम्यान खुनाच्या एकूण 11 घटना घडल्या होत्या. त्यापैकी 9 प्रकरणांचा तपास लागला होता. यावर्षी 3 खुनाच्या घटना घडल्या व सर्वप्रकरणांचा तपास लागला.

खुनाचा प्रयत्नाचा यंदा 2 घटना तर सदोष मनुष्यवधाचे एक प्रकरण, बलात्काराच्या एकूण 14 घटना घडल्या. यासर्व प्रकरणांचा तपास लागला असल्याचे धनिया यांनी सांगितले.ं

बलात्कार प्रकरणातील सर्व प्रकरणातील संशयित व पिडित या एकमेकांशी परिचित असल्याचेही तपासात आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.

रस्ता अपघाताच्या 110 घटना घडल्या त्यातील 109 प्रकरणांचा पोलिसांनी तपास लावला. तपासांची सरासरी 99 टक्के आहे. यंदा पाच महिन्यात एकूण 600 जणांवर चाप्टर केसीस दाखल करण्यात आली आहे. मागच्या वर्षी हा आकडा 408 इतका होता असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT