Hindu Janjagruti Samiti Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 'लव्ह जिहाद विरोधी कायदा' लागू करा; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Pramod Yadav

Hindu Janjagruti Samiti

फोंडा: अल्पवयीन मुली, युवती आणि महिला यांच्यावरील अत्याचारांच्या विरोधात कठोरात कठोर दंड देण्याची कायद्यात तरतूद करा. तसेच, गोव्यात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली. समितीच्या फोंडा येथील क्रांती मैदानात आज (२९ ऑगस्ट) सायंकाळी काढलेल्या मोर्चात या मागण्या करण्यात आल्या.

महिलांची सुरक्षितता हा राष्ट्रीय स्तरावरील खूप महत्त्वाचा विषय बनला आहे. गोव्यामध्ये वर्ष २०१९ मध्ये ५१, वर्ष २०२० मध्ये ४३, वर्ष २०२१ मध्ये ४९, वर्ष २०२२ मध्ये ५५ आणि वर्ष २०२३ मध्ये ६२ अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले.

गुन्हेगारांना कायद्याचे भय नाही, दंडाचे भय नाही. काही काळाने समाज या घटना विसरतो, त्यामुळे पुन्हा पुन्हा या घटना घडतच आहेत, असे समितीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी आया-बहिणींवर हात टाकणार्‍यांचे हात आणि पाय छाटून ‘चौरंगा’ करण्याची शिक्षा दिल्यानंतर लगेचच अशा गुन्ह्यांचे प्रमाण थांबले होते. असा वचक गुन्हेगारांवर जेव्हा निर्माण होईल, तेव्हाच या घटनांवर अंकुश ठेवता येऊ शकतो.

मुलीं-मुलांना शाळा-महाविद्यालयांमधून स्वसंरक्षण प्रशिक्षण द्यावे. यासाठी हिंदु जनजागृती समितीची ‘रणरागिणी’ शाखा शासन किंवा शाळांचे व्यवस्थापन यांना सर्वतोपरी साहाय्य करण्यास सिद्ध आहे.

ओटीटी आणि मूव्ही प्लॅटफॉर्मवर तरुणांमध्ये अश्लीलता पसरवणारे अश्लील चित्रपट आणि वेब सीरिज सहज उपलब्ध आहेत. या फिल्म्स आणि ओटीटी मीडियाला वेळीच आळा घालावा, असे हिंदू जनजागृती समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

Goa Sports: केंद्रीय जलतरण स्पर्धेत गोव्याची यशस्वी कामगिरी! सक्षम, धिमनला रौप्यपदके

Accident In Goa: दत्तवाडी साखळीत बुलेट आणि चारचाकीचा भीषण अपघात

Devara Part 1: गोव्यातील वॉटर ॲक्शन सीन, गाणी आणि बरचं काही... NTR ने चित्रपटाबाबत केले अनेक खुलासे

Goa Chess Tournament: मानांकन स्पर्धेत गोव्याच्या खेळाडूंची विजयी सलामी; रशिया-इंग्लंडमधून खेळाडूंचा सहभाग

SCROLL FOR NEXT