कचरा व्यवस्थापन प्रकल्पावरुन कुडचिरेत तणाव, पोलिस - स्थानिकांमध्ये झटापट; 50 पेक्षा अधिकजण ताब्यात

Waste Treatment Plant: अखेर प्रकल्पासाठी भू-सर्व्हेक्षणाचे काम बंद करता येणार नाही. असे स्पष्ट करुन आमदार शेट तेथून निघून गेले.
कचरा व्यवस्थापन प्रकल्पावरुन कुडचिरेत तणाव, पोलिस - स्थानिकांमध्ये झटापट; 50 पेक्षा अधिकजण ताब्यात
kudchire bicholimDainik Gomantak
Published on
Updated on

waste treatment plant at kudchire bicholim

डिचोली: कचरा व्यवस्थापन प्रकल्पावरून मये मतदारसंघातील कुडचिरे गाव पेटून उठला आहे. प्रकल्पाच्या विरोधात दंड थोपटलेल्या संतप्त कुडचिरेतील लोकांनी आज (गुरुवारी) रस्त्यावर उतरून नियोजित प्रकल्पासाठी हाती घेतलेले भू-सर्व्हेक्षणाचे काम रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी लोकांचा हा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी पोलिस आणि लोकांमध्ये झटापटही झाली.

कायदा आणि सुव्यवस्था हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण होताच, पोलिसांनी ५० पेक्षा ज्यास्त स्थानिक लोकांना ताब्यात घेवून काही वेळानंतर सोडून दिले. भू- सर्व्हेक्षणावेळी कुडचिरे गावात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

ग्रामस्थ ठाम : कुडचिरे गावातील बाराजण देवस्थान

परिसरात कचरा प्रकल्प उभारण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. मात्र याला कुडचिरेतील लोकांचा ठाम विरोध आहे. विरोध डावलून नियोजित प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही स्थानिक लोकांनी दिला आहे.

कचरा व्यवस्थापन प्रकल्पावरुन कुडचिरेत तणाव, पोलिस - स्थानिकांमध्ये झटापट; 50 पेक्षा अधिकजण ताब्यात
Margao: रेल्वे स्थानकावर 'तो' उतरला अन् पोलिसांना संशय आला; मुंबईतून अल्‍पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

कुडचिरे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सर्व्हेक्षण चालले आहे, असे समजून स्थानिकांनी सर्व्हेक्षणाला विरोध केला. मात्र, तिथे प्रस्तावित असलेला प्रकल्प कचरा व्यवस्थापनाचा नाही. स्थानिक स्वराज संस्थेकडून अन्य कोणत्यातरी कामासाठी सर्व्हेक्षण केले गेले आहे.

बाबूश मोन्सेरात, घनकचरा व्यवस्थापन मंत्री

आमदार प्रकल्पाच्या बाजूने

नियोजित प्रकल्पावरून कुडचिरे गावात तणावग्रस्त वातावरण निर्माण होताच, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट नियोजित प्रकल्पस्थळी आले. त्यांनी संतप्त कुडचिरेवासियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र लोक काहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. आमच्या गावात हा प्रकल्प नकोच. हाच नारा लोकांनी लावून धरला होता.

अखेर प्रकल्पासाठी भू-सर्व्हेक्षणाचे काम बंद करता येणार नाही. असे स्पष्ट करुन आमदार शेट तेथून निघून गेले. यावेळी घटनास्थळी बराच गोंधळ झाला. अधिकारी आणि पोलिस दुपारी कुडचिरे गावातून निघून गेल्यानंतर तणाव काहीसा निवळला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com