Shacks Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: पर्यटक येतात, तासनतास बसतात, बिल न भरता निघून जातात; शॅक मालकांनी मांडली व्यथा

Tourism impact Goa: नववर्षाच्या दिवशी एका शॅकमध्ये झालेल्या वादामध्ये एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर पुन्हा पर्यटकांना मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आल्याने राज्याची चुकीची प्रतिमा निर्माण होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Tourism Impact Goa Report

पणजी: गोव्याच्या अप्रतिम समुद्रकिनाऱ्यांवर देश-विदेशातील पर्यटकांची सतत गर्दी होत असली तरी किनारी भागात वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांनी पर्यटन उद्योगावर दुष्परिणाम होण्याची शक्यता शॅक व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे. नववर्षाच्या दिवशी कळंगुट येथील एका शॅकमध्ये झालेल्या वादामध्ये एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर पुन्हा पर्यटकांना मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आल्याने राज्याची चुकीची प्रतिमा निर्माण होत आहे.

गोव्यातील शॅक मालकांच्या मते, स्थानिक पर्यटक आणि शॅक कर्मचाऱ्यांमधील वादांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बहुतांश वेळा संगीताचा आवाज, बिल भरण्याचे मुद्दे किंवा मद्यप्राशनामुळे बिघडलेले वर्तन यावरून वाद निर्माण होतात, असे शॅक मालक संघटनेचे सरचिटणीस जॉन लोबो यांनी सांगितले.

शॅक मालकांच्या म्हणण्यानुसार, अनेक पर्यटक शॅकमध्ये तासनतास बसून राहतात, मद्यपान करून वाद घालतात किंवा बिल न भरताच निघून जातात. आमच्याकडे ३० ते ५० टेबल्स असतात. प्रत्येक ग्राहकावर लक्ष ठेवणे अवघड आहे.

पर्यटकांच्या वर्तनातील बदल

परदेशी पर्यटकांची घटती संख्या आणि स्थानिक पर्यटकांची वाढत चाललेली गुंडागिरी शॅक मालकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. पूर्वी परदेशी पर्यटक आमचे मुख्य ग्राहक होते. ते सुसंस्कृत होते आणि दीर्घकाळ राहायचे. आता स्थानिक पर्यटक अल्प काळासाठी येतात पण खूप समस्या निर्माण करतात, असेही लोबो यांनी स्पष्ट केले.

लवकरच पर्यटन मंत्र्यांना भेटणार

शॅक मालक संघटनेचे उपाध्यक्ष सेबी डिसोझा यांनी सांगितले की, या घटनांमुळे परिणाम होणार नाही. आम्ही पुढील आठवड्यात पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची भेट घेऊन यासंदर्भात कठोर उपाय काढण्याची विनंती करणार आहोत. याविषयी विशेष आदेश करून कठोर कायदा अमलात आणण्याची आवश्यकता आहे. पर्यटक जर मस्ती करत असेल तर त्यांच्यावर करावी ही झालीच पाहिजे. बिल न देता जाणे किंवा दादागिरी करणे असे प्रकार पर्यटक करत असल्याने या गोष्टी घडतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT