गेले काही दिवस गोव्यात पावसाची उघडझाप सुरु आहे. सूर्यकिरणे काही वेळ प्रखर दिसू लागतात तोच काही वेळात ढगाळ वातारणाने पावसाच्या हलक्या सरी बरसू लागल्याची दिसू लागते. या पार्श्वभूमीवर पूढील चार दिवस राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसतील असे ही हवामान विभागाने आपला अंदाज वर्तवला आहे.
(IMD predicts light to moderate rain in Goa state in next four days)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्ववण्यात आली आहे. यामध्ये 17 आणि 18 ऑगस्ट रोजी राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबरोबरच राज्यात बहुतांश ठिकाणी 20 ऑगस्ट 2022 रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्वतवली आहे.
पावसाने हजेरी लावत बळीराजाला दिलासा देणे आवश्यक
सध्य स्थितीत राज्यातील डोंगर माथ्यावर असणाऱ्या खऱीप पिकांना पावसाच्या पाण्याची गरज आहे. कारण आता भातासारखी पिके पोटरीला येणार असल्याने यावेळी पिकाला पाण्याची कमतरता भासल्यास भात फोल जाण्याचे प्रमाण अधिक वाढू शकते. त्यामूळे पावसाने हजेरी लावत बळीराजाला दिलासा देणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.