Yellow alert Dainik Gomantak
गोवा

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Yellow Alert In Goa: राज्यात पुढील पाच दिवस तरी कमाल तापमानात बदल होणार नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

Pramod Yadav

Yellow Alert In Goa

गोव्यात दोन दिवस हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वेधशाळेने केले आहे.

गोवा हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात आजपासून (१३ मे) ते १५ पर्यंत हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. याकाळात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, नागरिकांच्या खुल्या मैदानात अथवा शेतात काम करण्यास टाळावे अशी सूचना हवामान खात्याने दिली आहे.

राज्यात पुढील पाच दिवस तरी कमाल तापमानात बदल होणार नसल्याचे हवामान खात्याने म्हटले असून, पुढील आठवडाभर राज्यातील कमाल तापमान ३३ - ३५ अंश दरम्यानच राहणार आहे.

कोणती काळजी घ्याल?

वादळी वाऱ्यासह पावसाच्या काळात उंच झाडे आणि धोकादायक इमारत अथवा संरचनेजवळ आश्रय घेणे टाळा.

पूरग्रस्त भागात वाहन चालवू नका.

कमकुवत झाडे किंवा भूस्खलन/खडक पडण्याची शक्यता असलेल्या भागात थांबणे टाळा.

ज्या भागात वारंवार पाणी साचण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो अशा ठिकाणी जाणे टाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: मुख्यमंत्री साहेब ‘त्या’ धनगराच्या पोराचे काम होणार?

पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा पुन्हा समोर; ट्रम्प यांच्याशी गद्दारी करत इराणला दिली लष्करी मदत? खळबळजनक रिपोर्ट आला समोर

Goa Case: दिनेश गावडेंच्‍या शवचिकित्सा पोस्टमॉर्टमवरून उफाळला वाद; प्रकरण तापले : वन खाते-फॉरेन्सिक विभाग आमनेसामने

Goa Accident: स्कूटरवरील नियंत्रण सुटले अन् होत्याचे नव्हते झाले! बांबोळीत मुंबईच्या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू

Tim David Video: मुंबईला हरवलं पण शिस्त विसरला! टीम डेव्हिडचा 'तो' अश्लील इशारा कॅमेऱ्यात कैद; 'BCCI'ने ठोठावला दंड

SCROLL FOR NEXT