Red Alert In Goa Dainik Gomantak
गोवा

Red Alert In Goa: गोव्यात रेड अलर्ट; पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा

Red Alert In Goa: पावसाची एकंदरीत परिस्थिती पाहता हवामान विभागाकडून आज 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

Manish Jadhav

Red Alert In Goa: गोव्यात येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाची एकंदरीत परिस्थिती पाहता हवामान विभागाकडून आज 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. हा रेड अलर्ट आज (शनिवार, 8 जून) आणि उद्यासाठी असणार आहे. तर 10 आणि 11 जून रोजी ऑरेंज अलर्ट सांगण्यात आला आहे.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, नागरिकांना पूरप्रवण क्षेत्रात न जाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. आपत्कालीन मदतीसाठी गोवा SDMA कडून 08322419550, 08322225383, 08322794100 किंवा डायल 112 नंबर जारी करण्यात आले आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. आज (8 जून) उत्तर आणि दक्षिण गोव्यात 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यामुळे आज विभागातर्फे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, आज सकाळपासूनच पाऊस सुरु झाला. राज्यात काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना समोर आल्या. येत्या 24 मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने नागरिककही सतर्क झाले आहेत. हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने समुद्रकिनारी न जाण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, पर्यटकांनाही खबरदारी बाळगण्यास सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT