Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

IMD: गोवा, महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान खात्याने येत्या पाच दिवसांत मुंबई आणि गोव्यासह इतर अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय हवामान खात्याने (IMD) येत्या पाच दिवसांत मुंबई आणि गोव्यासह (Goa) इतर अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, किनारी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये IMDने शनिवार-रविवार मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (IMD Monsoon Alert Updated News)

महाराष्ट्रात सलग 4 दिवस जोरदार पाऊस पडत आहे. IMD ने मुंबई आणि गोव्यात पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात 10 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान लोकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

IMD च्या अलर्टनुसार गुजरातमध्ये 11 जुलैपर्यंत मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये नवसारी, वलसाड, दमण, दादर नगर हवेली, सौराष्ट्र आणि कच्छमधील जामनगर, जुनागढ, देवभूमी द्वारका आणि दक्षिण गुजरातमधील कच्छ जिल्ह्यांचा समावेश आहे, जेथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मात्र, गुजरातमधील काही भागामध्ये आधीच पावसाने दडी मारली आहे. जुनागडच्या पावसानंतर पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे 10 आणि 11 जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची IMDने शक्यता वर्तवली आहे. 9 जुलैला कोस्टल कर्नाटक, 8 आणि 11 तारखेला कोस्टल आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये पावसाचा इशारा दिला आहे.

याशिवाय 8 आणि 10 जुलै रोजी पश्चिम मध्य प्रदेश आणि 11 जुलै रोजी पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. IMD ने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांमध्ये 8-9 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT