Yellow Alert In Goa 
गोवा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Yellow Alert In Goa: गोव्यात मागील काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत असून, राज्यातील काही भागांना अवकाळीने झोडपले आहे.

Pramod Yadav

Yellow Alert In Goa

गोव्यात हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून, पुढील दोन दिवस राज्यातील दोन्ही जिल्ह्यात हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. वेधशाळेने वर्तवलेला अलर्ट 18 मे पर्यंत वाढविण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज (गुरुवारी) पुढील तीन तासांत राज्यातील पेडणे, डिचोली, बार्देश, सत्तरी, वाळपई, साखळी, फोंडा, शिरोडा, धारबांदोडा, केपे, काणकोण, सांगे या भागात वीजांसह किरकोळ ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, यात राज्यातील विविध जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसात अनेक ठिकाणी पडझड झाली तर, राजधानी पणजीत विविध भागात पाणी साचले.

नैऋत्य मान्सून 31 मे च्या सुमारास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर चार दिवसांनी गोव्यात येत असतो. दरम्यान, तुर्तास याबाबत अंदाज व्यक्त करता येणार नाही, अशी माहिती गोवा हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT