Yellow Alert In Goa Dainik Gomantak
गोवा

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस 'यलो अलर्ट', वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; गोमंतकीयांना सतर्कतेचा इशारा

Manish Jadhav

गोव्याला परतीच्या पावसानं झोडपून काढलं आहे. सत्तरी, डिचोलीसह राज्यातील अनेक भागात पावसानं धूमशान घातलं आहे. यातच, हवामान विभागाकडून 12 आणि 13 ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी 'यलो अलर्ट' वर्तवण्यात आला आहे. या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. याकाळात 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. गोव्यात पुढील एक ते तीन तासांत सत्तरी, धारबांदोडा आणि डिचोली तालुक्यात वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सत्तरीत पावसाचा तडाखा!

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सत्तरीतील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपून काढलं. अनेक ठिकाणी झाडांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले. तसेच, वीज तारांवर झाडे पडून वीज खांब उखडून पडल्याने वीज पुरवठाही खंडित झाला. एका बाजूने धो-धो पाऊस तर दुसऱ्या बाजूने वादळी वारा यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ब्रह्मकरमळी, खोतोडा आणि इतर भागात मोठ्याप्रमाणात झाडांची पडझड झाली. परतीच्या पावसाने घोलवाडा- खोतोडा येथे सिता राम घोलकर यांच्या घरावर झाड पडून मोठे नुकसान झाले.

अस्मानी संकट घोंगावतेय; शेतकरी चिंतेत

राज्यातील अनेक भागात परंपरागत भातशेती केली जाते. अनेक शेतकरी जूनच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात भात पेरणी करतात त्यामुळे रोपणी जुलै महिन्यात येते व सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कणसे येऊन नोव्हेंबरच्या शेवटी कुठे भात कापणी होते. यंदा जून महिन्यात भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना जुलैमधील मोठ्या प्रमाणात बरसलेल्या पावसाचा फटका बसला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News: गोव्यात दुरुस्तीच्या कामांमुळे 'या' परिसरामध्ये राहणार वीजपुरवठा खंडित; कार्यालयाने दिले वेळापत्रक

Goa Recruitment: सुवर्णसंधी! लवकरच तीन हजार पदांची भरती; आयोगाच्या हालचालींना वेग

Top 5 Longest Range Missile: जगातील 'ही' 5 लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे उडवतात धास्ती!

...प्रत्येकाचा रावण वेगळा, दहनाचे मार्ग वेगळे, लुटण्याचे सोनेही वेगळेच, समान घटक फक्त मायबाप मतदार; संपादकीय

Digital Goa: इंटरनेट वापरात गोवा अव्वल! ऑनलाईन बँकिंगचं प्रमाण वाढलं; दुसऱ्या क्रमांकावर 'हे' राज्य!

SCROLL FOR NEXT