Sadananda Tanawade Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: शिवरायांचे विचार आत्मसात करा- तानावडे

सदानंद तानावडे ः म्हापशात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

गोमन्तक डिजिटल टीम

शिवरायांचा पराक्रम देदीप्यमान होता. शिवरायांनी कुठल्याही धर्मांचा द्वेष न करता, अठरा पगड जातींना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केले. यातून शिवरायांनी सर्व जाती-पातींना सोबत घेऊन स्वराज्यात राहण्याची शिकवण दिली. ते खरे रणनितीकार तसेच दूरदृष्टी नेते होते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले.

म्हापसा येथील हुतात्मा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. तसेच मान्यवरांनी शिवरायांच्या तसबिरीला यावेळी फुलं अर्पण करून अभिवादन केले.

माजी नगराध्यक्ष संदीप फळरी म्हणाले, शिवरायांनी मावळ्यांना सोबत बलाढ्य अशा मुगलशाहीशी त्यांनी दोन हात केले. ते उत्तम व्यवस्थापक गुरु होते. शिवरायांची शिकवण तसेच त्यांच्या विचारांचे अनुकरण केल्यास समाजासोबतच राष्ट्र घडविण्यास याची मदत होईल.

म्हापसा उत्कर्ष संस्थेतर्फे ही तिथीनुसार शिवजयंती शुक्रवारी (ता.10) सकाळी साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण कारेकर, नगरसेवक सुधीर कांदोळकर, नूतन बिचोलकर, तसेच श्रीपाद सावंत, अमेय नाटेकर, आशिष शिरोडकर, तुषार टोपले, बाबा गंवडळकर, आदी मान्यवर यावेळी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र शेट्ये तर आभार महेश शिरगांवकर यांनी मानले.

पुतळ्याचे अनावरण

भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते शुक्रवारी करासवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी आमदार ग्लेन टिकलो, माजी नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो, महाबळेश्वर तोरस्कर, अमेय नाटेकर तसेच मोठ्या संख्येने शिवप्रेमी हजर होते.

करासवाडा औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारावरील रस्त्याशेजारी उभारलेल्या लहान चौथऱ्यावर ही मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. हा पुतळा ‘धर्मो रक्षति रक्षित’ या संघटनेकडून उभारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT