calangute sarpanch Joseph Sequeira  Dainik Gomantak
गोवा

Calangute Shivaji Maharaj Statue: कळंगुटमधील ‘ते’ ठिकाण पुतळ्यासाठी नव्हते योग्य !

जोसेफ सिक्वेरा : पुतळा ‘हटाव’ चा ठराव सर्वांनुमतेच

दैनिक गोमन्तक

कळंगुटमधील अश्वारुढ शिवपुतळा हटवण्यासंदर्भात पंचायतीने शिवस्वराज्य, कळंगुट या संस्थेला पत्र पाठवले होते. यात कुठेच शिवपुतळा जमीनदोस्त करणार किंवा मोडून टाकणार, असे म्हटले नव्हते.

मात्र, काही लोकांनी तसेच प्रसारमाध्यमांनी दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवून लोकांना चिथावले. ज्या जंक्शनवर हा शिवपुतळा स्थापित आहे, ती जागा अपघातप्रवण क्षेत्र आहे. त्यामुळेच आम्ही तिथे या अश्वारुढ शिवपुतळ्यास अनुकूल नव्हतो, असे स्पष्टीकरण कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी दिले.

दरम्यान, काहींनी जाणीवपूर्वक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी शिवपुतळ्याचा हा मुद्दा हिंदू-ख्रिश्चन,असा बनवून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गेली 30 वर्षे मी पंचायत स्तरावर काम करतोय, परंतु मी कधीच कुठल्याच धर्मात भेदभाव केला नाही, असेही सिक्वेरा म्हणाले.

शुक्रवारी (ता.२३) पंचायत कार्यालयात पत्रकार परिषदेतून त्यांनी शिवपुतळ्यावरूनच्या वादावर आपली व पंचायत मंडळाची बाजू मांडली.

जोसेफ सिक्वेरा म्हणतात...

  1. शिवरांयाविषयी मला माहिती आहे. शाळेत मी शिवरायांचा अभ्यास केलाय. कारण मराठीत आम्हाला शिवरायांचे धडे होते. राहिला प्रश्न पुतळा हटविण्याचा, तो जंक्शन अपघातप्रवण क्षेत्र असल्याने तिथे पंचायतीस हायमास्ट दिवा उभारायचा होता. आम्ही शिवराय किंवा शिवपुतळ्याच्या विरोधात नाही.

  2. २० जून रोजी पंचायत कार्यालयाबाहेर जमलेल्या शिवप्रेमींना मला दोष द्यायचा नाही. कारण, त्यांची प्रसाद शिरोडकर, सुदेश मयकेर, ज्ञानेश्वर मठकर व अमित पुजारी यांनी दिशाभूल केली. त्यांनी जमावाला चिथावल्याने संतप्त शिवप्रेमींनी पंचायत कार्यालयासोबत वाहनांची नासधूस केली, असा दावा सिक्वेरा यांनी केला.

हायमास्ट उभारायचे होते...:

नाईकावाडा जंक्शन जिथे सध्या पुतळा उभारला, ते अपघातप्रवण क्षेत्र आहे. त्यामुळे तिथे हायमास्ट उभारण्याचा निर्णय पंचायत मंडळाने घेतला. त्यानुसार, काम सुरू होणार होते, पण मुख्यमंत्र्यांनी फोन करुन हे काम हाती घेऊ नका, अशी सूचना केली,असे सिक्वेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्रसरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

SCROLL FOR NEXT