Fish Market Goa Dainik Gomantak
गोवा

Vasco Fish Market: बेकायदा घाऊक मासे विक्री बंद! वास्कोमधील विक्रेत्यांच्या आक्षेपानंतर मुरगाव पालिकेची कारवाई

Mormugao Municipal Council: वास्को येथील मासळी मार्केटमधील विक्रेत्यांनी पुन्हा एकदा बेकायदा घाऊक मासे विक्रीवर आक्षेप घेतल्यानंतर मुरगाव पालिकेने घाऊक मासे विक्री करण्यावर बंदी घातली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: येथील मासळी मार्केटमधील विक्रेत्यांनी पुन्हा एकदा बेकायदा घाऊक मासे विक्रीवर आक्षेप घेतल्यानंतर मुरगाव पालिकेने घाऊक मासे विक्री करण्यावर बंदी घातली आहे. यावेळी या विक्रेत्यांनी पालिकेला आम्हाला देखील व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. पालिकेने त्यासाठी एक निश्चित वेळ ठरवावी, अशी मागणी केली. मात्र पालिकेने बेकायदा मासे विक्रीला थारा देणार नाही, असे बजावले आहे.

वास्कोच्या पूर्वीच्या मासळी मार्केट इमारतीचे काम पूर्ण होत आले असून लवकरच तेथे मासे विक्री करण्यास सुरुवात होईल. परंतु गेल्या काही वर्षांत मासळी मार्केटमधील व्यावसायिक व शहरात घाऊक मासे विक्री करणारे यांच्यात वाद आहे.

मासळी मार्केट (Fish Market) व्यवसायिकांना घाऊक मासळी विक्रीमुळे आर्थिक फटका बसतो, असा त्यांचा दावा आहे. वास्को, खारीवाडा व इतर काही ठिकाणी घाऊक मासे विक्री केली जाते. याबाबत मासळी मार्केट व्यावसायिकांनी मुरगाव पालिकेत तक्रार केली आहे.

या तक्रारीची दखल घेत नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी मुख्याधिकारी दिपेश प्रियोळकर, लेखा अधिकारी उदय वाडकर, पालिका निरीक्षक विवेक देसाई, वास्को पोलिस, वाहतूक पोलिस यांच्यासमवेत खारीवाडा भागाला भेट देत त्या परिसरात बेकायदा घाऊक मासे विक्री करण्यास हरकत घेतली असून बेकायदा व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले.

वेळ निश्चित करावी

खारीवाडा, वास्को येथे घाऊक मासे विक्रीचा व्यवसाय पूर्वापार चालत आलेला आहे. त्यामुळे येथील विक्रेत्यांना व्यवसाय करण्याचा पूर्ण हक्क आहे. पालिकेने घाऊक विक्री करण्यासाठी विक्रेत्यांना वेळ निश्चित करून द्यावी, अशी मागणी नगरसेवक मथायस मोन्तेरो यांनी केली.

पालिका बेकायदा घाऊक मासे विक्री करण्यास कोणालाही परवानगी दिलेली नाही. तसेच टि.बी. कुन्हा चौक व खारीवाडा रस्त्यावरील फुटपाथवर बेकायदा घाऊक मासे विक्री केल्यास पालिका गप्प बसणार नाही.
गिरीश बोरकर, नगराध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT