Water Sports Canva
गोवा

Caranzalem Panaji: करंजाळेत मच्छिमार त्रस्त! अवैध जलक्रीडांनी किनारा व्यापल्याची तक्रार

Caranzalem News: करंजाळे येथील किनाऱ्यावर एका संस्थेकडून जलक्रीडा होत होत्या. आता या संस्थेने अर्धा किनारा व्यापला, त्यामुळे रापणीचे मासे काढण्यासाठी मच्छिमारांना त्रास होतो.

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal water sports at Caranzalem beach Panaji

पणजी: करंजाळे (पणजी) येथील किनाऱ्यावर दरवर्षीप्रमाणे एका संस्थेकडून जलक्रीडा होत होत्या. या सुरवातीला कमी जागेत होत होत्या, त्यामुळे मच्छिमारांना त्याचा त्रास होत नव्हता. परंतु आता या संस्थेने अर्धा किनारा व्यापला आहे, त्यामुळे रापणीचे मासे काढण्यासाठी मच्छिमारांना त्रासाला सामोरे जावे लागते. शिवाय जलक्रीडा आयोजकानेच पोलिसांना बोलावून आमच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे आम्ही आता त्याच्याविरोधात परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी आलो असल्याचे येथील रापणकारांनी सांगितले.

पणजी पोलिसांत तक्रारीसाठी आलेल्या रापणकारांनी सांगितले की, करंजाळे किनाऱ्यावर १९ मच्छिमार आहेत, आणि ते पारंपरिक मासेमारी करतात. मासेमारीवर सर्वांचा उदरनिर्वाह चालतो. जलक्रीडा व्यावसाियकाने आता अर्धा किनारा व्यापला आहे. जाब विचारताच आमच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यामुळे आम्हीही तक्रार दिली असून, पोलिस निरीक्षकांनी कारवाईचे आश्वासन दिल्याचे रापणकार म्हणाले.

किनारा व्यापला

करंजाळे (पणजी) येथील किनाऱ्यावर दरवर्षीप्रमाणे एका संस्थेकडून जलक्रीडा होत होत्या. या सुरवातीला मच्छिमारांना त्याचा त्रास होत नव्हता. परंतु आता या संस्थेने अर्धा किनारा व्यापला, त्यामुळे रापणीचे मासे काढण्यासाठी मच्छिमारांना त्रास होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT